गावठी कट्टा बाळगणाराला अटक

पिंपरी – विनापरवाना गावठी कट्टा बाळगल्याने एका तरुणाला भोसरी पोलिसांनी अटक केली. भोसरी-आळंदी रस्त्यावरील हुतात्मा चौकानजीक रविवारी (दि. 19) रात्री दहा वाजता ही कारवाई केली. दोन जीवंत काडतुसे आणि कट्टा असा मिळून 20 हजारांचा ऐवज हस्तगत केला आहे. रमजान मशाक कुरणे (रा. शांतीनगर झोपडपट्टी, भोसरी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस नाईक विपुल जाधव यांनी फिर्याद दिली आहे. कुरणे हा हुतात्मा चौकात येणार असल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याच्याकडे गावठी कट्टा आढळून आला. त्यानुसार “आर्म ऍक्‍ट’ प्रमाणे त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार एन. पी. पाटील तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)