गावठी कट्टा. काडतूस जप्त

पिंपरी – पिंपळे गुरव येथे एका 25 वर्षीय तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक करण्यात आली. आहे.

इसाक रज्जाक शेख (वय-25, रा. पिंपळे गुरव) असे या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक नितीन मारूती दांगडे (वय-31) यांनी फिर्याद दिली.

-Ads-

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे गुरव येथील रस्त्यावर एक तरुण गावठी कट्टा घेऊन उभा असल्याची खबर मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून इसाकला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस आढळले. पोलिसांनी सुमारे 25 हजार रुपयांचा कट्टा व काडतूस जप्त केले असून त्याच्यावर सांगवी पोलीस ठाण्यात बेकायदा शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याचा पुढील तपास सहायक पोलीस संजय निकुंभ करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)