गावठी कट्टा, काडतूस जप्त ; तरुणाला अटक

पिंपरी – बेकायदेशीर रित्या गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्या तरुणाला भोसरी पोलिसांनी अटक केले आहे.

विकास मनोज साके (वय-23, रा. झेंडे चाळ, देहूगाव, मूळ-सातारा) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यातील हवालदार गणेश पंढरीनाथ सावंत यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक तरुण स्वतःजवळ हत्यार बाळगून तो इंद्रायणीनगर ई प्रभागच्या पाठीमागील सार्वजनिक रस्त्यावर आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार वरीष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून विकास याला ताब्यात घेतले, त्याची झडती घेतली असता एक गावठी कट्टा आणि काडतूस आढळून आले. पोलिसांनी विकास याच्याकडून गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस असा 20 हजार 200 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. पुढील तपास भोसरी पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)