गावठी कट्टयासह दोघांना अटक

पिंपरी – निगडी पोलिसांनी गावठी कट्ट्यासह दोन तरुणांना अटक केली आहे. ही कारवाई अप्पूघर कॉर्नरजवळ ट्रान्सपोर्ट नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर करण्यात आली.

यामध्ये 15 हजार रुपये किंमतीचा एक गावठी कट्टा आणि 30 हजार रुपये किंमतीची एक मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. इर्शाद बकरीदी शेख (वय-23, रा. सोनवणे वस्ती, ताथवडे. मूळ रा. श्रवणपूर, निदौरा, उत्तर प्रदेश) आणि दीपक रामबाबू मिश्रा (वय-27, रा. पवारवस्ती, ताथवडे. मूळ रा. चौखटा, उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

-Ads-

निगडी पोलीस ठाण्याचे तपास पथक घरफोडी आणि वाहन चोरीच्या गुन्ह्याबाबत निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना त्यांना इर्शाद व दीपक बाबत माहिती मिळाली. त्यांनी सापळा रचून या दोघांना ताब्यात घेतले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)