गावठी कट्टयासह एकाला अटक

देहुरोड – स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने सापळा रचून गावठी कट्टा आणि जिवंत काडतूसासह एक आरोपीस अटक केली आहे. मामुर्डी, शितळानगर येथील जकात नाक्‍याजवळ मंगळवारी (दि.27) सायंकाळी सातच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

नवाब रियाज पठाण (वय 31, रा.गांधीनगर, देहुरोड, मुळ रा.नागपूर ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला बातमीदाराकडून माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अंकुश माने, पो.ना. दत्तात्रेय बनसोडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी देहुरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मामुर्डी, शितळानगर येथील जकात नाक्‍याजवळ सापळा रचला. पोलिसांना मिळालेल्या माहितीप्रमाणे पठाण तिथे आला आणि पोलिसांनी त्याला लाकडी मुठीचा एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूसासह त्याला अटक केले. पठाणला अटक करुन देहुरोड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. पुढील तपास देहुरोड पोलीस करणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)