गावच्या यात्रेत देवाला नैवेद्या ऐवजी शिधादान

यात्रेत आखाड्यालाही महत्त्व…
गावच्या यात्रेत कुस्त्यांचा आखाड्यालाही महत्त्व असून आखाड्याचे उद्‌घाटन माजी सभापती पंढरीनाथ पठारे व अर्जुन पुरस्कार विजेते पै. काका पवार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी पैलवान चंद्रकांत कटके, गणेश मानगुडे आदी उपस्थित राहणार आहेत. 25 निकाली कुस्त्यानंतर शेवटची कुस्ती महाराष्ट्र केसरी पैलवान अभिजीत कटके व उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत यांच्यात होणार आहे. यासह आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाचा पैलवान गणेश जगताप व मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलाचा पैलवान अक्षय शिंदे, कुस्ती गोकुळ वस्ताद तालमीचा पैलवान सागर बिराजदार व पुणे शहरातील पैलवान सचिन येलभर हे मल्लही भिडणार आहेत.

लोणीकाळभोर येथील उपक्रमाची राज्य पातळीवर चर्चा; अन्य गावांकडूनही होत आहे अनुकरण

लोणी काळभोर – पूर्व हवेलीतील सुख संपन्न गाव म्हणून उल्लेख होत असलेल्या लोणीकाळभोरचे ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथाच्या यात्रेत नैवेद्या ऐवजी शिधादान मोहिम राबविली जाते. गतवर्षी पासून सुरू झालेल्या यास उपक्रमास गावासह पंचक्रोषितील भाविकांतून मोठा प्रतिसाद मिळत असल्याने शेकडो टन धान्य जमा होत आहे. हा उपक्रम यावर्षीही राबविला जाणार असून जमा झालेले गहू, तांदूळ, हरबरा डाळ, तेल, तूप, गुळ, साखर, नारळ, गव्हाचे पीठ परिसरातील अनाथांना, आश्रमांना दान करण्यात येत आहे. विशेष म्हणजे हवेली तालुक्‍यातील बऱ्याच गावांनी शिधादान मोहिमेचे कौतुक व अनुकरण करण्यास सुरुवात केल्याने या यात्रेची दखल शासकीय पातळीवरही घेतली जाणार आहे, असे श्री काळभैरवनाथ अंबरनाथ सर्व देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश काळभोर व अंबरनाथ देवस्थान ट्रस्टच्या उत्सव समितीचे अध्यक्ष सतीश काळभोर यांनी सांगितले.
पूर्व हवेलीतील सर्वात मोठे आणि अर्थसंपन्न गाव म्हणून लोणीकाळभोर गावचा उल्लेख होतो. पुणे शहरालगत असलेल्या या गावाला धार्मिकदृष्ट्याही महत्त्व आहे. त्यामुळेच येथील यात्रेत नैवेद्या ऐवजी शिधादान मोहिमेला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. याही वर्षी ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथाची वार्षिक यात्रा शनिवारी (दि. 31) व रविवारी (दि. 1 एप्रिल) साजरी करण्यात येत आहे. यात्रेनिमित्त धार्मिक, सांस्कृतिक व करमणुकीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आली असून शिधादान मोहिमेसह महाराष्ट्र केसरी व उपमहाराष्ट्र केसरी यांच्यात होणारी कुस्ती लढत यात्रेचे मोठे आकर्षण असणार आहे.
लोणीकाळभोर गावच्या यात्रेनिमित्त हभप विनोद महाराज काळभोर यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताहातच शिधादानाचे आवाहन करण्यात आल्यानंतर शनिवारी पहाटे श्रींचा महामस्तकाभिषेक. रात्री 9 ते 12 या वेळेत काळभैरवनाथाची पालखी मिरवणूक, मध्यरात्री 12 ते 3 या वेळेत छबिन्याचा कार्यक्रम तसेच सकाळी 6 वाजेपर्यंत मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)