गावगुंडांवर मोक्‍कांतर्गत होणार कारवाई

सहा दुकानांवर पेट्रोल बॉम्ब फेकून केली होती दगडफेक

पुणे – हवेली पूर्व भागात गावगुंडांच्या टोळक्‍याने उरुळी देवाची आणि वडकी परिसरातील किरकोळ व्यापाऱ्यांच्या सहा दुकानांवर हप्ता देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून पेट्रोल बॉम्ब आणि दगडफेक करीत बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास धुमाकूळ घाटल्याची घटना घडली. स्थानिक पोलिसांकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने भयभीत झालेल्या व्यापाऱ्यांनी गुरुवारी थेट जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी तत्काळ संबंधित गावगुंडांवर मोक्‍कांतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी दिली. भेटीच्यावेळी त्यांच्याबरोबर भागीरथ जांगीड, रमेश सोळंकी यांच्यासह अन्य व्यापारी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

उरुळी देवाची, वडकी परिसरातील किरकोळ व्यावसायिकांना हप्त्याची मागणी झाल्यानंतर त्यांनी त्यास नकार दिला आणि त्यानंतर संबंधित गावगुंडांनी थेट दुकानांवरच हल्ला चढवत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. स्थानिक पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर अपेक्षित प्रतिसाद न आल्याने पीडित व्यापाऱ्यांनी थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. पाटील यांना घटनेसंदर्भातील सविस्तर निवेदन दिल्यानंतर त्यांनी तत्काळ लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना संपर्क करून हल्ला करणाऱ्या गावगुंडांचा ताबडतोब बंदोबस्त करण्याचा आणि त्यांच्यावर मोक्‍का अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्याचा आदेश दिला असल्याचे निवंगुणे यांनी सांगितले. त्यामुळे व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

त्रास देण्याच्या घटनांमध्ये वाढ
पुणे शहराच्या उपनगरांमध्ये किरकोळ व्यापाऱ्यांना त्रास देण्याच्या अनेक घटना घडत आहेत. दमदाटी करून हप्ता मागणे, जीवे मारण्याच्या धमक्‍या देणे, दगडफेक करून दहशत माजविणे असे प्रकार घडत आहेत. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांकडून व्यापाऱ्यांना संरक्षण मिळावे आणि गावगुंडांवर कडक कारवाई व्हावी. ही आमची प्रमुख मागणी असल्याची माहिती पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी दिली. यावरही पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत, असेही त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)