गावकऱ्यांकडून चास कमान धरणातून शेवटच्या टोकापर्यंत पाणी सोडण्याची मागणी

चास कमान धरणाच्या उजव्या कालव्यातून शेवटच्या टोकापर्यंत पाणी सोडण्याची मागणी आवर्तन कालावधी वाढवावा व उर्मट अधिकारी कर्मचारी यांच्यावर कारवाई करून कालव्याची दुरुस्ती करण्यासाठी चास कमान धरणाच्या उपविभागीय अभियंता कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन

रामचंद्र सोनवणे

राजगुरूनगर: चास कमान धरणाच्या उजव्या उजव्या कालव्याचे पाणी शेवटच्या टोकापर्यंत जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरु राहणार आहे उजव्या कालव्याकडे अधिकारी जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असतील तर अशा उर्मट अधिकाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. पाणी आमच्या हक्काचे आहे ते मिळाले नाही तर आमच्या जमिनी परत करा व उजवा कालवा बंद करा असा खणखणीत इशारा सहा गावाच्या शेतकऱ्यांनी चास कमानधरण प्रशासनाला दिला आहे.

चास कमान धरणातून शिरोली, चांडोली, वाकी, वडगाव पाटोळे, खरपुडी, कडूस, या गावातील शेतकऱ्यांना उजव्या कालव्यातून दि ५ रोजी आंदोलन केल्यानंतर पाणी सोडण्यात आले होते मात्र या पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. आज पर्यंत हे १४ दिवस उलटूनही हे पाणी उजव्या कालव्याच्या शेवटच्या टोकापर्यंत न गेल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. १४ दिवसात १० किलोमीटर पाणी जात नसल्याने अधिकारी काय करतात असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. उजव्या कालव्याकडे अधिकारी जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आल्याने शेतक-यांच्या शेतीचे मोठे नुकसान होत आहे. पाट बंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांची संख्या १२० पेक्षा जास्त असल्याने हे अधिकारी कर्मचारी या कालव्याच्या दुरुस्तीकडे, देखभालीकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

उजव्या कालव्याच्या पाण्यावर शेतकरी मोठ्या प्रमाणात खरीप आणि रब्बी हंगामात शेतीचे पिके घेतात रब्बी हंगाम सुरु असल्याने आणि शेतकऱ्यांच्या शेताला उजव्या कालव्यातून पाणी येत नसल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे मात्र तो पाणी मिळण्यासाठी आक्रमक झाला आहे. कालवा दुरुस्ती झालीच पाहिजे. पाणी किती दिवस सुरु राहणार असा शेतकऱ्यांनी सवाल केला. जोपर्यंत शेतकऱ्यांची पाण्याची गरज पूर्ण होत नाही तोपर्यंत पाणी सुरु ठेवावे. धरणाचे कर्मचारी उजव्या कालव्यावर तैनात करा त्यांच्याकडून कालव्याची दुरुस्ती करा. शेतकऱ्यांचे समाधान होत नाही तो पर्यंत पाणी सुरु ठेवावे.

१५ दिवस उजव्या कालव्यात पाणी सोडूनही शेवटच्या टोकापर्यंत पाणी न मिळाल्याने व कालव्यातून मोठी गळती होत असताना अधिकारी, कर्मचारी वर्गाला सांगूनही त्यावर उपयायोजना होत नसल्याने शेतकऱ्यांनी आज राजगुरुनगर येथे येवून पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. आज पुन्हा राजगुरुनगर येथील चास कमान धरणाच्या उपविभागीय अभियंता उत्तम राऊत यांच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, खेड बाजार समितीच्या उपसभापती सुरेखा टोपे, शिरोलीच्या सरपंच संगीता केदारी, वाकी बुद्रुक च्या सरपंच वैशाली जारे, चांडोलीचे सरपंच राजेंद्र वाघमारे, वडगाव पाटोळे गावाह्य सरपंच दिपाली गायकवाड, दोंदे गावाच्या सरपंच कविता उढाणे, कडूस व गोलापूर च्या सरपंच जयश्री नेहेरे, शेतकरी नेते संजय सावंत, रवींद्र सावंत, केशव अरगडे, हरिभाऊ वाडेकर, काल्यानशील देखणे, संजय पवळे, गोरक्ष पवळे, दिगंबर सावंत, मंगेश सावंत, चीकाशेठ वाघमारे, गौतम लोखंडे, प्रभाकर गाढवे, गणेश तनपुरे, रामभाऊ टोपे, केरभाऊ सावंत, चंद्रकांत सावंत जितु वाडेकर यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

यावेळी शिरोलीचे माजी सरपंच संजय सावंत म्हणाले कि, चास कमान धरण विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांच्या समस्यांची दखल घेत नाहीत. कर्मचारी वर्ग मोठा असताना कालव्याची देखभाल आणि गळती थांबविण्याचे प्रयत्न केले जात नाहीत केवळ शेतकऱ्यांना त्रास देण्याची भूमिका घेत आहेत मात्र यापुढे हे सहन केले जाणार नाही शेतकऱ्यांच्या समस्या व उजव्या कालव्याची दुरुस्ती आणि शेवटच्या टोका पर्यंत पाणी पोहचले नाही तर अधिकारी कर्मचारी वर्गाला दोषी धरून त्यांना शेतकरी हिसका दाखवतील. उजव्या कालव्याचे पाणी शेवाच्या घटकापर्यंत पोहचले पाहिजे त्यासाठी आवर्तनाचा कालावधी वाढवण्यात यावा. लोकांची दिशाभूल करू नये. अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. उजव्या कालव्याचे पाणी कालव्याच्या शेवट पर्यंत काही दिवस राहील असे लेखी दिल्या शिवाय येथून हटणार नाही अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली.

जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे म्हणाले कि, शेतकरी आक्रमक आहेत अधिकारी वर्गाने शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. कालव्याची दुरुस्ती तत्काळ झाली पाहिजे त्यासाठी शेतकरी आर्थिक मदत करतील. नियोजनासाठी कर्मचारी जाग्यावर नसतात त्यामुळे उजव्या कालव्याची अवस्था दयनीय झाली असून गळती होत आहे. उजव्या कालव्याला पाणी सोडण्यापूर्वी कालव्याची दुरुस्ती करणे गरजेचे होते. शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेवू नये शेतकऱ्यांना वेठीस धरल्यास यापुढे शेतकरी शांत बसणार नाही. कालव्यात जाढे झुडपे उगवली आहेत. झाडांच्या मुळ्या उपटण्याऐवजी ते काय उपटतात असा सवाल त्यांनी केला.

बाजार समितीच्या उपसभापती सुरेखा टोपे म्हणाल्या कि, तालुक्यात दुष्काळ पडला आहे. शेतातील पिके वाया जात आहेत. धरणाच्या उजव्या कालव्यात शेवट पर्यंत पाणी सोडणे गरजेचे आहे. शेतीसाठी पाणी नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देवून त्यांना मुबलक पाणी उपलब्ध करावे.

चास कमान धरणाचे उपविभागीय अभियंता उत्तम राऊत यांनी सांगितले कि, पाणी सोडण्याचा आढावा शासनाकडे दिला होता. उजवा कालवा दुरुस्त करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र मशीन वेळेत मिळाल्या नसल्याने त्याची दुरुस्ती केली जाईल. कालव्याच्या शेवट पर्यंत पाणी कसे जाईल याची काळजी घेतली जाईल. सुरु असलेले आवर्तन २० दिवसपुढे वाढविण्यात येईल. शेतकऱ्यांचे नुकसान केले जाणार नाही.उजव्या कालव्यावरील कर्मचारी वर्गाला सूचना केल्या असून हलगर्जी करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई केली जाईल.

यावेळी काल्यानशील देखणे, मंगेश सावंत, चीकाशेठ वाघमारे, गणेश तनपुरे, यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी आंदोलनासाठी आलेले शेतकरी आक्रमक झाले होते. जोपर्यंत लेखी मिळत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन सुरु ठेवल्याने व जोरदार घोषणाबाजी केल्यानंतर अधिकार्यांनी शेतकऱ्यांना लेखी आश्वासन दिले


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
5 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
2 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)