गाळ्यांच्या फेरलिलावास नागरिकांचा अल्प प्रतिसाद

कराड – येथील भाजी मंडईसह अन्य ठिकाणच्या राहिलेल्या 109 गाळ्यांसाठी झालेल्या फेरलिलावाकडे नागरिकांनी अक्षरश: पाठ फिरवली. पंधरा दिवसांपूर्वीच्या पहिल्या बोलीस 114 पैकी 7 गाळ्यांचा लिलाव झाला होता. त्यातील उरलेल्या 107 पैकी केवळ तीन गाळ्यांचा लिलाव काल झाला. मात्र, गाळे लिलावासाठी लोकांचा अल्पसाच प्रतिसाद मिळाला.

पालिकेच्यावतीने बांधण्यात आलेल्या गाळ्यांभोवती वाढलेली अतिक्रमणे, त्याचा व्यवसायावर होणारा परिणाम तसेच सुविधांकडे पालिकेचे झालेले दुर्लक्ष यामुळे फेरलिलावात कोणीही भाग घेतला नाही. मुख्याधिकारी यशवंत डांगे, विरोधी पक्ष नेते सौरभ पाटील, नगरसेवक विजय वाटेगावकर, वैभव हिंगमिरे यांच्या उपस्थितीत लिलावाची प्रक्रिया पूर्ण झाली. करवसुली अधिकारी उमेश महादार यांनी गाळ्यांच्या लिलावाची बोली केली.

भाजी मंडईत 7 वर्षांपासून पडून असलेल्या गाळ्यांचा पंधरा दिवसांच्या फरकाने दुसऱ्यांदा लिलाव झाला. मात्र यालाही कमी प्रतिसाद मिळाला. त्यात तीन गाळ्यांचा लिलाव होवून 83 व 69 क्रमांकाच्या गाळ्यास प्रत्येकी 1 लाख 11 हजार रुपये व 65 क्रमांकाच्या गाळ्यास 1 लाख 40 हजारांची बोली झाली. मंडईतील 107, अण्णा भाऊ साठे शॉपिंग सेंटरमधील दोन तर सुपर मार्केटमधील तीन हॉलचा फेर लिलाव घेण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)