गाळयुक्‍त शिवार योजनेचा लाभ घ्या

पिरंगुट – शेतकऱ्यांनी आपल्या जवळपास असलेल्या पाझर तलाव अथवा धरणातून काढलेला गाळ आपल्या शेतात नेऊन टाकल्याने शेतातील उत्पादनात वाढ होणार आहे. शेतकऱ्यांना हा गाळ मोफत देण्यात येणार आहे. याचा सर्व शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी केले.

महाराष्ट्र शासन वन व महसूल विभागाच्या वतीने गाळमुक्‍त धरण व गाळयुक्‍त शिवार ही नवीन योजना राबविली जात आहे. या योजनेचा शुभारंभ उरावडे चोरघेवाडी (ता. मुळशी) येथे जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी सुभाष भागडे, तहसीलदार सचिन डोंगरे, नायब तहसीलदार नागेश गायकवाड, सभापती कोमल वाशिवले, जिल्हा परिषद सदस्या अंजली कांबळे, गटविकास अधिकारी स्मिता पाटील, मुळशी पंचायत समिती शाखा अभियंता एस. सी. जाधव, अरुण आंबेगावकर, विकास चोरघे, राजेंद्र मारणे, अंकुश गुंड, दिलीप पवळे, दीपक सरडे, माऊली कांबळे, ग्रामसेविका केदार, विविध विभागाचे अधिकारी, ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सौरभ राव म्हणाले, या योजनेतंर्गत पुणे जिल्ह्यात जवळपास 320 गावांत येत्या 15 जूनपर्यंत ही योजना सुरू करणार आहे. प्रत्यक्षात 32 गावांत ही योजना सुरू आहे. अस्तित्वात असलेल्या पाझर तलाव, गाव तलाव, वळण बंधारे, केटी वेअर, साठवण बंधारे हे गाळमुक्‍त करण्याचे नियोजन आहे. या योजनेत लोकसहभाग महत्त्वाचा आहे. धरण व शिवारातील गाळ काढल्याने पाण्याच्या साठवणूक क्षमतेत वाढ होणार आहे. या साठलेल्या पाण्याचा सदुपयोग करणे महत्त्वाचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)