गाळपेरा क्षेत्रात पीक घेण्यासाठी प्रतिसाद नाही

अर्जाची संख्या तुलनेने कमी : प्रशासनाने दिली मुदतवाढ

पुणे – जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संभाव्य चारा टंचाईला सामोरे जाण्यासाठी शासनाकडून पावले उचलली जात आहेत. त्यासाठी गाळपेरा क्षेत्रांवर चारा पिकांचे उत्पादन करण्यात येणार असून त्यासाठी शेतकऱ्यांना बियाणांचे वाटप करण्यात येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जिल्ह्यात साडेचारशे हेक्‍टरहून अधिक गाळपेरा क्षेत्र असून त्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहे. मात्र, शेतकऱ्यांनी त्याला फारसा प्रतिसाद दिला नसून अर्ज मागवण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. त्यानंतर आलेल्या अर्जानुसार शेतकऱ्यांना बियाणांचे वाटप करण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन विभागाने म्हटले आहे.

जिल्ह्यात यंदा पुरेसा पाऊस न झाल्यामुळे अत्तापासूनच पाणी टंचाईची समस्या उद्‌भवू लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून चाऱ्याचे उत्पादन वाढीसाठी, पुरेसे पाणी उपलब्ध असलेल्या गावातील शेतकऱ्यांना बियाणांचे वाटप करणे सुरू आहे. पहिल्या टप्प्यात मका, संकरीत बाजरी, ज्वारीच्या बियाणांचे वाटप करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात मका 250 क्विंटल, ज्वारी 50 क्विंटल, बाजरी 50 क्विंटल, न्युट्रीफीड 25 क्विंटल वाटप होणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील चारा पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी जलसंपदा तसेच जलसंधारण विभागाच्या प्रकल्पामध्ये पाणीसाठा कमी झाल्यामुळे बुडीताखालील जमिनी मोकळ्या झाल्या आहेत. अशा गाळपेरा क्षेत्रांवर चारा पिकांचे उत्पादन करून जनावरांसाठी चारा उत्पादन करण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला आहे. त्यानुसार कार्यवाही सुरू असल्याचे डॉ. विधाटे यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)