गारव्यासाठी एसी खरेदी करताय?

बाजारात आजघडीला अनेक प्रकारचे एसी उपलब्ध आहेत. त्यात अनेक प्रकारच्या सुविधा दिलेल्या असतात. जर आपल्याला एसी खरेदी करायचा असेल तर स्टार रेटिंग, कुलिंग कॅपेसिटी आदींबाबत माहिती असणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात एसीला मागणी वाढणे साहजिक आहे. घरात दोन प्रकारचे एसी बसवण्यात येतात. एक स्प्लिट एसी आणि दुसरा विंडो एसी. विंडो एसी हा खिडकीत बसवला जातो तर स्प्लिट एसीचा एक भाग भिंतीवर असतो तर दुसरा भाग मोकळ्या भागात बसवलेला असतो.

एसीच्या टनचा अर्थ
टनचा अर्थ हा त्याच्या वजनाशी जोडला जात नाही, तर त्याच्या कुलिंग क्षमतेशी जोडला जातो. एक एसी एक चौरस फूटाची जागा थंड करण्यासाठी 20 बीटीयू (ब्रिटिश थर्मल यूनिट) प्रतितास खर्च करते. साडेतीन बिटीयू हे एका वॅटच्या बरोबरीस असते. शंभर चौरस फुटासाठी एक टन एसी पुरेसे आहे. या हिशोबाने शंभर ते दीडशे चौरस फुटाच्या खोलीला थंड करण्यासाठी दीड टनचा एसी पुरेसा ठरू शकतो.

200 चौरस फुट किंवा त्यापेक्षा अधिक जागा थंड करण्यासाठी दोन टन किंवा त्यापेक्षा अधिक मोठ्या एसीचा विचार करावा लागेल. बाजारात पाच हजार बीटीयूपासून ते 24 हजार बीटीयूपर्यंत एसी उपलब्ध आहेत. जर आपण गरजेपेक्षा कमी टनचा एसी खरेदी कराल तर तो कडक उन्हाळ्यात फायदेशीर ठरणार नाही. अर्थात एसी जितक्‍या जास्त टनाचा असेल, त्याप्रमाणात वीज लागणार, हे उघड आहे.

नवीन तंत्रज्ञानाने एसी सुविधा
टन आणि स्टार रेटिंगशिवाय आता बदलत्या तंत्रज्ञानाने एसीमध्ये अत्याधुनिक बाबींचा समावेश करण्यात आला आहे.

सॅटेलाइट एसी
व्हिडिओकॉन कंपनीचा आर्याबॉट जगातील पहिला सॅटेलाइट बेस्ड एसी आहे. या मदतीने आपण स्माटफोनमध्ये उपलब्ध रिमोट ऍपच्या मदतीने एसी कंट्रोल करू शकता. हा एसी वायफायच्या माध्यमातून आपले लोकेशनच्या हिशोबाने सेटिंगमध्ये बदल करत राहतो. यात जीपीएसची सुविधा दिलेली आहे. जर आपण एसी बंद न करताच घराबाहेर गेला तर तो एसी आपोआप बंद होईल आणि घरी पोचताच वाय-फायच्या रेंजमध्ये येताच तो ऑन होईल.

डास पळवणारा एसी: एलजी कंपनीने डासांना पळवणारा एसी उपलब्ध करुन दिला आहे. डेंगीचा वाढता धोका लक्षात घेता हाचांगला पर्याय मानला जातो. हे फिचर एसी चालू न करताच काम करते. डासांना पळवण्यासाठी हा एसी ऍल्ट्रासॉनिक तरंगांची निर्मिती करतो, मात्र एसीची अल्ट्रासॉनिक तंत्रज्ञान डासांना पळवण्यास पुरेशी ठरत नाही.

हॉट अँड कोल्ड एसी: या श्रेणीत थंडीत गरम आणि उन्हाळ्यात थंड ठेवण्याचे काम एसी करते. याला ऑल वेदर एसी असेही म्हणता येईल. संपूर्ण वर्षभर वापरण्यात येणाऱ्या एसीमुळे त्याची गुणवत्ता टिकून राहते आणि गुंतवणूकीच्या दृष्टीने तो फायदेशीर राहतो.

इन्वर्टर एसी: इन्वर्टर एसीमध्ये अशा प्रकारचे फंक्‍शन असते की तेथे गरजेप्रमाणे कॉप्रेंसरवर भर दिला जातो. जर कुलिंग निश्‍चित केलेल्या तापमानापर्यंत पोचले असेल तर कॉम्प्रेसरची मोटर आपला वेग कमी करते. यामुळे वीजेचा खप हा सामान्य एसीच्या तुलनेत 20 ते 30 टक्‍के कमी राहतो. सध्या अशा प्रकारचे तंत्रज्ञान केवळ स्प्लिट एसीमध्ये आहे.

लक्षात ठेवा
एसीची वेळोवेळी सर्व्हिसिंग करत राहा.
ज्या एसी कंपनीचे सर्व्हिसिंग नेटवर्क चांगले आहे, त्याच कंपनीचा एसी खरेदी करणे हिताचे ठरेल.
एसीचे कुलिंग जेव्हा 25 अंशाच्या आसपास राहते, तेव्हा वीज कमी खर्च होते.
आपण घरात नसताना पाळीव प्राण्यासाठी एसी सुरू ठेवू इच्छीत असाल तर त्यात पाच अंशांने वाढ करावी. यामुळे वीजेची बचत होईल.

जर आपण कुलिंग आणि वीज यांच्यात संतुलन राखून ठेवायचे असेल तर इकोनॉमी मोडवर एसीबरोबर खोलीतील पंखाही सुरू ठेवा. इकॉनॉमी मोडवर एसीचे बिल बऱ्यापैकी कमी राहते.

अंजली महाजन 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)