गायीला राष्ट्रीय पशू घोषित करा – उमर अहमद इल्यासी

अहमदाबाद – हिंदूसाठी पवित्र असणाऱ्या गायीला राष्ट्रीय पशू घोषित करावे, अशी मागणी अखिल भारतीय इमाम संघटनेचे प्रमुख उमर अहमद इल्यासी यांनी केली आहे. गायीला राष्ट्रीय पशू घोषित करावे, हा संदेश आपण सरकारपर्यंत पोहोचवला पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. यावेळी सभागृहातील अनेकांनी उभे राहून टाळ्या वाजवत त्यांच्या भूमिकेचे स्वागत केले. गुजरातमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका धार्मिक कार्यक्रमात काल त्यांनी ही मागणी केली.

या संदर्भात एका हिंदी वर्तमानपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, इमाम इल्यासी यांनी यावेळी दिल्लीत घडलेला एक किस्साही सांगितला. घटना दोन वर्षांपूर्वीची असून दिल्लीत एक जैन आणि मुस्लिम कुटुंब शेजारी-शेजारी राहत होते. यातील मुस्लिम कुटुंब बकरी ईदच्या दिवशी बकरीचा बळी देत असल्याने तो जैन परिवार दहा दिवसांसाठी घर सोडून जायचे.

या गोष्टीची माहिती मला मिळाल्यानंतर त्या मुस्लिम कुटुंबीयांना मी भेटलो आणि शेजाऱ्यांना आपल्या धार्मिक कार्यामुळे त्रास होऊ नये असे मानव धर्म सांगतो. त्यामुळे शेजाऱ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या, असे सांगितल्यानंतर बकरी ईदच्या दिवशी त्या मुस्लिम कुटुंबांनी बाहेर जाऊन बळी द्यायला सुरूवात केली. त्यामुळे जैन कुटुंबीयांच्या भावनांचा योग्य मान राखला गेला, असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)