गायीच्या हल्यात बिबट्याचा मृत्यू

File photo

उंबरी-बाळापूर येथील घटना

संगमनेर:  तालुक्‍यातील उबंरी-बाळापूर येथे शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास सुर्यभान रावसाहेब उंबरकर यांच्या मुक्त गोठ्यात बिबट्याने घुसून धुमाकूळ घातला. यावेळी 30 ते 35 गाईंनी भितीपोटी केलेल्या हल्यात दीड वर्ष वयाच्या बिबट्याचा मृत्यू झाला. तर यावेळी बिबट्याच्या हल्यात एक कालवड जखमी झाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

उंबरी-बाळापूर शिवारात उंबरकर यांचे राहते घर व गायीचा गोठा आहे. त्यामध्ये लहान-मोठी अशी 30 ते 35 जनावरे आहेत. शनिवारी रात्री साडेआठच्या गोठ्यात बिबट्याने प्रवेश केला. त्यामुळे गोठ्यातील जनावरे भितीपोटी सैरावैरा पळत सुटली. आवाज ऐकून उंबरकर कुटुबातील सूर्यभान उंबरकर, शंशिकात उंबरकर, संतोष उंबरकर आदी कुटुंबियांनी बाहेर येऊन पाहिले. गोठ्यात त्यांना बिबट्या दिसला. यावेळी या कुटुंबाने तत्काळ याबाबत वनविभागाला माहिती दिली. तर गोठ्याबाहेर आणखी एक बिबट्या असल्याचे या कुटुंबाच्या लक्षात आल्याने हे कुटुंबघाबरले व त्यांनी आरडा-ओरड केली. ते ऐकुन परिसरातील नागरीक व माहिती मिळताच वनविभागाचे वनरक्षक डांगे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली.

यावेळी त्यांनी गोठ्यात जाऊन पाहिले असता, गायीच्या पायाखाली येवून दीड वर्षाचा नर जातीचा बिबट्या मृत झाल्याचे आढळले. तर एका कालवडीला बिबट्याने हल्ल्यात जखमी केले होते. याप्रसंगी वनअधिकाऱ्यांनी घटनेचा पंचनामा करुन बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला असून, निंबाळे येथील नर्सरीत त्याचे शवविच्छेदन केले. दरम्यान या परिसरात बिबट्याचे प्रमाण अधिक असून, शेतकऱ्याच्या पशुधनावर हल्याच्या घटना नियमित घडत असतात. काही दिवसांपूर्वी परिसरातील नितीन उंबरकर व प्रल्हाद शिंदे यांच्या पाळीव प्राण्यांवर बिबट्याने हल्ला केला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)