गायींची बेकायदेशीर वाहतूक; दोघांवर गुन्हा

नारायणगाव- पिकअपमध्ये सहा गायींना दाटीवाटीने कोंबून त्यांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या दोघांवर नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिकअप चालक इर्षद अल्ताफ बेपारी (वय 22), क्‍लिनर साई वसीम बेपारी (वय 18, दोघे रा. जुन्नर) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. तर शिवशंकर राजेंद्र स्वामी (वय 24 रा. शिवाजीनगर, पुणे यांनी फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील म्हणाले की, गुरुवारी (दि. 21) सायंकाळी 5 वाजून 50 मिनिटांनी येडगाव गावच्या हद्दीत जुने पुणे-नाशिक रस्त्यावर 14 नंबर पुलाच्या जवळ इर्षद बेपारी व साई बेपारी हे पिकअप ( एमएच 16 ऐवाय 7774) मध्ये तीन जर्सी गायी, तीन खिल्लार जातीचे गायींना निर्दयतेने दोरीने घट्ट बांधून त्यांना हालचाल न करता येईल अशा स्थितीत दाटीवाटीने कोंबून नेण्यात येत होते. तसेच यावेळी पिकअपमध्ये गायींसाठी चारा-पाण्याची व्यवस्था न करता त्यांना निर्दयतेने जुन्नर आळेफाटा-संगमनेर रस्त्याने घेऊन जात असताना मिळून आले आहे. पुढील तपास सहायक पोलीस फौजदार एस. जे. केंगले करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)