नवी दिल्ली – हिंद महासागरात एक अजब घटना गेल्या आठवड्यात घडली. 9 वर्षांपूर्वी गायब झालेले एक जहाज म्यानमारजवळ आढळून आले. या मालवाहू जहाजावर ना कोणी खलाशी होता, ना काही माल. सॅम रताउलांगी 1600 या जहाजाचे नाव असून त्याच्यावर इंडोनेशियाचा झेंडा आहे.

जहाजावरील ट्रान्सपॉंडर नुसार सन 2009 साली त्याचे अस्तित्व तैवानजवळ होते एवढी माहिती मिळते. त्यानंतर त्याचे अस्तित्व आजच जाणवले आहे. मर्तबान खाडीत सागर किनाऱ्यापासून 11 किमी अंतरावर तरंगत असलेले हे जहाज सर्वप्रथम मच्छिमारांना दिसले होते, याची निर्मिती सन 2001 मध्ये झालेली आहे.

म्यानमारचे अधिकारी कालच जहाजावर जाऊन आले आहेत. जहाजावर ना कोणी खलाशी, ना काही माल असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)