गायकवाड-एनएसएफ लढतीत बरोबरी

  मनोहर करंडक क्रिकेट स्पर्धा

पुणे – मनोहर करंडक क्रिकेट स्पर्धेच्या गटसाखळी फेरीतील गायकवाड क्रिकेट ऍकॅडमी आणि ननावरे स्पोर्टस फाऊंडेशन (एनएसएफ) यांच्या दरम्यान झालेला सातवा सामना चुरशीच्या लढतीनंतर अनिर्णीत राहिला. ही स्पर्धा 19 वर्षांखालील मुलांसाठी आयोजित करण्यात आली आहे.

-Ads-

येथील विराग क्रिकेट ऍकॅडमीच्या मैदानात पार पडलेल्या या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या गायकवाड ऍकॅडमीने निर्धारित 20 षटकांत सात गडी बाद 135 धावा करताना एनएसएफ समोर 136 धावांचे आव्हान ठेवले होते. प्रत्युत्तरात फलंदाजी करताना एनएसएफ संघानेही निर्धारित 20 षटकांत चार गडी बाद 135 धावा केल्या. त्यामुळे हा सामना अनिर्णीत राहिल्याचे घोषित करण्यात आले.

एनएसएफ संघाकडून हर्ष ओस्वालने सर्वाधिक 50 धावा केल्या, तर श्रेयस नायकने 26 धावा करताना त्याला सुरेख साथे दिली. विजयासाठी काही धावांची आवश्‍यकता असताना हर्ष धावबाद झाला. तसेच पाठोपाठ श्रेयस देखील बाद झाला. त्यानंतर ध्रुव राठोडने विजय मिळवण्यासाठी प्रयत्न केला. परंतु तोही फटका लगावण्याच्या नादात बाद झाला. गायकवाड ऍकॅडमीच्या विनय गायकवाडने 21 धावा देत एक गडी बाद केला.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना विनय गायकवाड (25) आणि हर्षद शिर्के (28) यांच्या फलंदाजीच्या जोरावर, तसेच अंतिम षटकांमध्ये अथर्व सोंडकरच्या वेगवान नाबाद 13 धावांमुळे गायकवाड ऍकॅडमीने सात बाद 135 धावांपर्यंत मजल मारली. यावेळी एनएसएफकडून क्रिश लालवाणीने 14 धावांत 2, तसेच पार्थ परमारने 25 धावा देत दोन गडी बाद केले. अर्धशतक झळकावणारा हर्ष ओसवाल सामनावीर ठरला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)