गाढवांची वाढती संख्या सोशल मीडियावर चेष्टेचा विषय…

लाहोर : पाकिस्तानातील गाढवांची वाढती संख्या सोशल मीडियावर चेष्टेचा विषय बनलेला आहे. पाकिस्तानात गाढवांची संख्या वाढत असल्याचे सरकारी आर्थिक सर्वेक्षणात उघड करून दाखवली आहे. या सर्वेक्षणानुसार 2016 मधील गाढवांची सुमारे 51 लाख ही संख्या वाढून 2017 मध्ये 52 लाख झाली आहे. गाढवांची संख्या वाढण्याचा हा प्रकार चालूच आहे. सन 2017-18 च्या आर्थिक सर्वेक्षणानुसार पाकिस्तानातील गाढवांची संख्या वाढून 53 लाखावर गेली आहे. या साऱ्या आकडेवारीमुळे सोशल मीडियावाल्यांना करमणुकीचा एक मोठा विषय मिऴाला आहे…..

सन 2017 मध्ये गधा विकास कार्यक्रमासाठी पाकिस्तानमध्ये अब्जावधी रुपयांची गुंतवणूक करण्यात आलेली आहे. पंजाब सरकारच्या एका अहवालानुसार सरकारला दर वर्षी गाढवांच्या निर्यातीमुळे मिळणारे उत्पन्न राष्ट्रीय सकल उत्पन्नाचा एक महत्त्वाचा हिस्सा आहे.

गाढवांच्या संख्येप्रमाणेच शेळ्यामेंड्यांच्या बकऱ्यांच्या संख्येतही मोठी वाढ़ झाली आहे. गेल्या वर्षी पाकिस्तानातील शेळ्यांची संख्या 2 लाखांनी वाढली आहे, तर मेंढ्यांची संख्या 40 हजारने वाढली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)