गाडे बंधुंसह कर्डिलेंच्या कन्येबद्दल उत्सुकता 

नगर – राजकीय समिकरणे बदलणार प्रभाग म्हणून प्रभाग 4 कडे पाहिले जात आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांचे चिरंजीव व विद्यमान नगरसेवक योगिराज गाडे व राष्ट्रवादीकडून त्यांचे चुलत बंधु जितेंद्र गाडे यांच्या चुरशी लढत होत आहे. तसेच भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांची तिसरी कन्या ज्योती गाडे या देखील राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणुक रिंगणात उतरल्या आहेत. त्यामुळे या प्रभागात कोण बाजी मारणार याबाबत कमालीची उत्सुकता आहे.

अर्थात आ. कर्डिले हे भाजपचे आमदार असतांना त्यांची कन्या मात्र राष्ट्रवादीकडून रिंगणात उभी असल्याने कर्डिलेंची अडचण झाली आहे. त्यांची कोंडी करण्यासाठी राष्ट्रवादीकडून हा डाव टाकण्यात आला असून प्रा. गाडे यांना देखील खिंडीत पकडण्याचा यातून प्रयत्न झाला आहे. या प्रभागात शिवसेना व राष्ट्रवादी अशीच लढत वाटत असली तरी भाजपने देखील मोठे आव्हान उभे केले आहे.त्यामुळे कोणाचे पारडे जड आहे असे म्हणता येणार नाही. या प्रभागात भाजपने तगडे उमेदवार दिले आहेत. वंदना कुसळकर या भाजपच्या उमेदवार असून त्यांची लढत ज्योती गाडे व शिवसेनेच्या कमल दरेकर यांच्यात आहे.

-Ads-

या प्रभागात विद्यमान तीन नगरसेवक पुन्हा आपले नशीब अजमावत आहेत. त्यात योगिराज गाडे, स्वप्निल शिंदे व इंदरकौर गंभीर रिंगणात आहे. शिंदे व गंभीर एकाच भागात निवडणूक लढत आहे. त्यामुळे यात कोण विजय होणार हे येत्या दहा तारखेला स्पष्ट होईल. या भागात शिवसेना व राष्ट्रवादीचे वर्चस्व असले तरी नव्याने आलेल्या भागावर भाजपचे वर्चस्व आहे. त्यामुळे शिवसेना व राष्ट्रवादीसाठी नव्या भागात शिरकाव करावा लागणार आहे.

योगिराज गाडे यांनी नगरसेवकच्या माध्यमातून या भागात विकास कामे मोठ्या प्रमाणावर केली आहेत. तसेच त्यांचा संपर्कही मोठा आहे. त्यामुळे जितेंद्र गाडे यांच्या पुढे तसे मोठे आव्हान उभे आहे. अर्थात हा प्रभाग गोविंदपुरापर्यंत व्यापला गेल्याने तेथील मतदार गाडे बंधूमध्ये कोणाला प्रतिकुल ठरणार हे देखील महत्वाचे आहेत.

माजी नगरसेविका संगीता खरमाळे या भाजपच्या उमेदवार असून त्यांच्याविरोधात शिवसेनेच्या संगीता केरूळकर व राष्ट्रवादीकडून शोभा बोरकर यांच्यात लढत होत आहे. बोरकर या माजी नगरसेवक अजिंक्‍य बोरकर यांच्या मातोश्री आहेत. बोरकर यांचा या भागात मोठा जनसंपर्क आहेत. प्रभाग 4 ड मध्ये भाजपचे माजी शहराध्यक्ष मिलिंद गंधे यांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे स्वप्निल शिंदे यांच्या दृष्टीने अडचणीचे ठरणार आहे. या प्रभागात इंदरकौर गंभीर या राष्ट्रवादीच्या उमेदवार आहेत.

What is your reaction?
15 :thumbsup:
7 :heart:
0 :joy:
3 :heart_eyes:
1 :blush:
4 :cry:
2 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)