गाडी बंद पडल्याने कचऱ्याला ऊत

सातारा शहरातील तऱ्हा, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर

सातारा,  (प्रतिनिधी) – सातारा शहरात कचरा साठविण्यासाठी विविध ठिकाणी कचराकुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. कुंड्या भरल्या की कचऱ्याची गाडी हा कचरा हायड्रोलिकच्या सहाय्यान भरुन कुंड्या मोकळ्या केल्या जातात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ही गाडीच बंद पडल्याने कचराकुंड्या ओसंडून वाहू लागल्या असून शहरात कचऱ्याला जणू ऊतच आला आहे. दरम्यान, या कचऱ्याकडे पालिकेकडूनही गांभीर्याने पाहिले जात नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.
शहरातील वाढती वस्ती आणि लोकसंख्या लक्षात घेता कचऱ्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यासाठी शहरातील रस्त्यांवर जागोजागी कचऱ्या कुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. की जेणेकरुन नागरिकांना आपल्या घरातील कचरा या कुंड्यामध्ये टाकता येईल आणि शहरात स्वच्छता राहील. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कचराकुंड्या मोकळ्या करण्यासाठी येणारी गाडी बंद पडल्याने या कुंड्या भरुन वाहू लागल्या आहेत. त्यामुळे शहरात बऱ्याच ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. याबाबत नागरिकांनी पालिकेकडेही वारंवार तक्रारी केल्या आहेत. मात्र, तरीही पालिकेकडून नागरिकांच्या तक्रारींची दखल घेतली नसल्याने पालिका नागरिकांच्या आरोग्याबाबत किती सजग आहे, हे स्पष्ट होत आहे. पालिकेच्या निष्क्रीयतेमुळेच शहरातील कचऱ्याचे ढिग साचू लागल्याच्या संतप्त प्रतिक्रियाही नागरिकांमधून व्यक्त होऊ लागल्या आहेत.
शहरातील रस्त्यांवर कचऱ्याचे ढिग साचू लागल्यामुळे दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहेत. त्यामुळे शहरात साथीचे आजार फैलावण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहेत. मात्र, पालिकेच्या स्वच्छता विभागाला याच्याही काहीच देणंघेणं नसल्याचे विदारक वास्तव निदर्शनास येत आहे. तक्रारी होऊनही कचरा उचलला जात नाही. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)