गाडी खरेदीमध्ये 6 लाखांची फसवणूक

पिंपरी – गाडी खरेदीच्या बहाण्याने एका व्यावसायिकाला 6 लाख 30 हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अर्जुन गेनबा देशमुख (वय-48, रा. रहाटणी) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी गोरख भोंडवे (रा. भोंडवे वस्ती, बारामती) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देशमुख यांचा फेब्रिकेशनचा व्यवसाय आहे. त्यांनी 2016 साली शेवरलेट कंपनीची सेल, एलएस, टीसीडी आय ही गाडी स्वतःच्या नावावर करून घेण्यासाठी आरोपीच्या खात्यावर 6 लाख 30 हजार 396 रुपये भरले. मात्र, अद्यापही गाडी फिर्यादीच्या नावावर केली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी वाकड पोलिसांत धाव घेतली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)