गाडीवरील लाल दिवा काढल्यानंतर आता मंत्री राहण्यात काय अर्थ आहे? -देसाई

मुंबई : शिवसेना नेते आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी मंत्रीपद सोडण्याची तयारी दर्शवली आहे.तसेच यापुढे आपल्याला पक्षात काम करायला आवडणार असल्याचे मत देसाई यांनी व्यक्त केली आहे. सुभाष देसाईंचा अमृतमहोत्सवी सोहळ्याचा कार्यक्रम गोरेगावच्या नेस्को मैदानात नुकताच पार पडला. यावेळी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह प्रमुख नेते या कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी देसाई यांच्या चरित्राचेही प्रकाशित करण्यात आले.
यावेळी, शिवसेनेने सगळे काही दिले. आता ही मंत्रिपदाची झूलही उतरवावी. गाडीवरील लाल दिवा काढल्यानंतर आता मंत्री राहण्यात काय अर्थ आहे? असे सांगत मुख्यमंत्र्यांना टोला लगावला.तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख यांनी सामना दैनिकावरुन एकमेकाला चिमटे काढले. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात, सुभाष देसाई यांनीही सामनामध्ये रोखठोक लिहले पाहिजे अशी भावना व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)