गाडीला धक्‍का ; एकास मारहाण

पिंपरी – आकुर्डी येथे पार्क केलेल्या कारला दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरुन एकाला डोक्‍यात दगड घालून गंभीर जखमी केले आहे. ही घटना मंगळववारी रात्री पावण दोनच्या सुमारास घडली.

या प्रकरणी गणेश मुळीक, सुमीत तांबे व इतर दोन (पुर्ण नावे व पत्ता माहिती नाही) यांच्यावर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पवन अविनाश जगताप (वय-29, रा. आकुर्डीगाव) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जगताप यांनी आकुर्डी येथील मॅजेस्टीक चौकात त्यांची गाडी पार्क केली होती.यावेळी आरोपीच्या मोटार कारचा धक्का जगताप यांच्या कारला बसला. यावेळी जगताप यांनी जाब विचारला असता गणेश मुळीक याने मित्रांना बोलावून जगताप यांना मारहाण केली व त्यांच्या डोक्‍यात दगड घातला. यामध्ये जगताप गंभीर जखमी झाले. अद्याप कोणत्याच आरोपीला अटक झाली नसून निगडी पोलीस पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)