गाडीच्या काचा फोडून सव्वा लाखाची चोरी

सातारा-विसावा नाका परिसरात लावलेल्या महागड्या कारची काच फोडून चोरट्यांनी 1 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना गुरुवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली.याबाबत श्रीकांत भाऊसाहेब पवार (वय 48, कूपर कॉलनी, सदरबझार) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पवार हे त्यांची कार (एमएच 11 बीबी 9091) जिल्हा परिषद चौकात पार्क करून गेले होते. ते विसावा नका परिसरातील जीममध्ये गेले असताना चोरट्यांनी त्यांच्या कारची काच फोडली.कारमधील 70 हजार रुपयांची रोकड, 50 हजार रुपये किमतीचे दोन महागडे मोबाईल व लेदर बॅग असा एकूण 1 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरला. याप्रकरणी रात्री उशिरा सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरीचा अधिक तपास स.पो.नि श्रीकृष्ण पोरे करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)