गाडमोडीत जुगारी अड्ड्यावर छापा

यवत- दौंड तालुक्‍यातील खामगाव गावच्या हद्दीतील गाडमोडी येथे विलास जगताप यांच्या शेतात तीन पत्ते नावाचे जुगार पैशांवर खेळत असताना पोलिसांनी सोमवारी (दि. 28) रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान टाकलेल्या छाप्यात सहा आरोपींना पकडले. त्यांच्याकडून 1 हजार 580 रुपये रोख रक्कम आणि जुगार खेळण्याची साधने हस्तगत करण्यात आली असून, सहा आरोपींवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी अभिमन्यु दगडु धोत्रे, विलास नारायण जगताप, हिरामण दादासाहेब चव्हाण, तानाजी राजाराम जाधव, संतोष गीताराम नेटके, प्रवीण बंडू खेडेकर (सर्व रा. खामगाव, ता.दौड, जि. पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यवत पोलिसांना खबऱ्यामार्फत जुगारी अड्ड्याची माहिती मिळाली होती, त्यानुसार छापा टाकण्यात आला. या छाप्यात पोलीस हवालदार भागवत शिंदे, पोलीस नाईक गजानन खत्री, संजय नगरे, गणेश तारळकर, उतप्पा संकुल यांचा सहभाग होता. यवत पोलिसांनी सर्व आरोपींविरोधात मुंबई जुगार कायदा कलम – 12(अ) नुसार गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार भागवत शिंदे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)