“गाजा’चा परिणाम; ढगांची दाटी

लक्षणीय वातावरण बदल : थंडीचा जोर कमी

पुणे – राज्यात थंडी वाढण्यास सुरूवात झाली. त्यात गेल्या दोन दिवसांपासून पुणे आणि नाशिकमध्ये गारठा वाढला होता. पण, दक्षिण भारतात निर्माण झालेल्या “गाजा’ वादळामुळे वातावरणात पुन्हा बदल झाला आहे. त्यामुळे रविवारी अनेक ठिकाणी ढग दाटून आले होते. त्याचबरोबर किमान तापमानातही वाढ होऊन थंडीचा जोर कमी झाला आहे. ही स्थिती दोन दिवस राहण्याची शक्‍यता आहे.

-Ads-

शुक्रवारी राज्यातील सर्वांत कमी तापमान हे पुणे आणि नाशिकमध्ये नोंदविले गेले होते. त्यामुळे आता आगामी काळात थंडी वाढणार, अशी शक्‍यता वाटत असताने अचानक दक्षिण भारतातील “गाजा’ वादळामुळे सर्व वातावरण बिघडले. हे वादळ शुक्रवारी रात्री धडकल्यानंतर त्याचा परिणाम इतर राज्यांवरही झाला आहे. या चक्रीवादळाची तीव्रता कमी होऊन ते आता अरबी समुद्राकडे सरकत आहे. त्यामुळे दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये पावसाच्या हलक्‍या सरी कोसळण्याची शक्‍यता आहे. ही स्थिती आणखी दोन दिवस राहील. मंगळवारपासून वातावरण पुन्हा पूर्वीसारखे होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
2 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)