गाईच्या पोटातून निघाले तब्बल 30 किलो प्लॅस्टिक

बिजवडी- आजारी गाईच्या पोटातून ऑपरेशन करून निघाले असे काही जे बघून आपणही व्हाल आश्‍चर्यचकीत. शहा येथील एका गाईच्या पोटातून एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 25 ते 30 किलो प्लॅस्टिक निघाले आहे. ऐकण्यात ही घटना भलेही विचित्र वाटत असेल पण सत्य आहे. इंदापूर तालुक्‍यातील डॉक्‍टर लक्ष्मण आसबे यांनी सलग तीन तास ऑपरेशन करुन गाईच्या पोटातील हे प्लॅस्टीक काढून गाईला जीवदान दिले आहे.
धनाजी इजगुडे यांनी आठ दिवसांपूर्वीच ही गाय बाजारातून विकत आणली होती. गाय अजारी पडल्यानंतर तिच्या पोटात काहीतरी असल्याचे निषपन्न झाले आणि तिच्या पोटात प्लॅस्टीक सापडले. गाय जगली आणि एका शेतकऱ्याचा प्रपंच वाचला. खरतर ही एकच गाय नाही अशा अनेक गाईंच्या पोटात प्लॅस्टीक सापडणार आहे. मग शेकऱ्यांनी आपल्या गाईची काळजी कशी घ्यावी आणि कस ओळखावे की गाई का खात नाही, याबाबत पशु-वैद्यकीय सल्लागार डॉ. लक्ष्मण आसबे यांनी सांगितले की, धनाजी इजगुडे यांची गाई मागील काही दिवसांपासून आजारी असल्याचे त्यांच्या लक्षात आले व त्या गाईच्या पोटात काहीतरी प्लॅस्टीक सारखा तत्सम पदार्थ गाईच्या पोटीत असावा असा संशय आला आणि त्यांनी गाईचे ऑपरेशन करण्यास सुरुवात केली.
तब्बल तीन तास चाललेल्या या ऑपरेशन मधुन 30 किलो पेक्षा जादा प्लॅस्टीक गाईच्या पाटातून काढण्यात यश मिळवले आणि एका मुक्‍या जनावारांचा जीव वाचवण्यात यश आले. यावेळी त्यांनी असेही आवाहन केले की, लोक आपल्या काही वस्तू कॅरीबॅगमध्ये गाळुन त्या रस्त्यात टाकतात त्यात काहीवेळा शिळ अन्न असेत ते या गाईंच्या तोंडाला लागल्यास ते त्या खातात. मात्र, यामुळे गाईची मानसिकता अशिच होते की, प्रत्येक कॅरिबॅगमध्ये अन्नच आहे त्यामुळे गाई कॅरिबॅग खातात. पण गाईने खाललेली कॅरिबॅग तिच्या पोटात विरघळत नाही किंवा ती विरघळण्याची कोणतीच प्रक्रीया तिच्या पोटात होत नाही. त्यामुळे या प्लॅस्टीकच्या पिशव्या या ऑपरेशनशिवाय काढुच शकत नाही, असे त्यांनी नमूद केले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)