गांधी स्मारकावर हेलिकॅप्टरमधून पृष्पवृष्टी

आळंदीत जयंतीनिमित्त विविध उपक्रम : नगर पालिकेचा स्वच्छतेचा संदेश

आळंदी : राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आज (मंगळवारी) आळंदी नगर पालिका व इंद्रायणी घाटावरील गांधीजींच्या स्मारकाजवळ विविध उपक्रम राबवून राबविण्यात आले. यावेळी इंद्रायणी घाटावर गांधीजींच्या स्मारकावर हेलीकॅप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.
आळंदी येथील स्मारकाचा परिसर हा येथील विश्वसामाजिक सेवा संघाच्या कार्यकर्त्यांनी प्रथम स्वच्छ करुन घेतला. त्यानंतर उपस्थितांनी स्मारकास पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर नगर पालिकेमार्फत स्वच्छतेचा संदेश देणारी जनजागृती रॅली काढण्यात आली. केंद्र शासनाचे स्वच्छ सर्वेक्षण अभियान 2018 अंतर्गत स्वच्छता हीच सेवा या कार्यक्रमांतर्गत उपस्थितांनी स्वच्छतेविषयीक शपथ घेतली, त्यानुसार आपला परिसर स्वच्छ ठेवून इतर किमान चार जणांना तरी प्रोत्साहित करणेबाबत शपथ देण्यात आली.
यावेळी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, उपाध्यक्ष सचिन गिलबिले, नगरसेविका सुनिता रंधवे, शैला तापकीर, सविता गावडे, गटनेते पांडुरंग वहिले, नगरसेवक प्रशांत कुऱ्हाडे, सागर भोसले, पप्पु तापकीर, आळंदी पालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी आदींसह नागरिक उपस्थित होते. दरम्यान, स्वच्छता दिंडीमध्ये विविध प्रकारच्या जनजागृतीपर घोषणा देण्यात आल्या.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)