गांधी व डॉ. चिपाडे विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव

शिवसेनेचे गिरीश जाधव यांनी दाखल केले न्यायालयात अपील

नगर: भारतीय जनता पक्षाचे सुवेंद्र गांधी आणि राष्ट्रवादीचे डॉ. योगेश चिपाडे यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. गांधी आणि डॉ. चिपाडे यांचे अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने वैध ठरविले होते. शिवसेनेचे गिरीश जाधव यांनी गांधी, तर विशाल खोटे यांनी डॉ. चिपाडे यांच्याविरोधात यांनी हे अपील दाखल केले आहे.

महापालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज छाननीत भाजपचे सुवेंद्र गांधी यांचा अर्ज घराच्या अतिक्रमणांमुळे बाद ठरविला होता. राष्ट्रवादीचे डॉ. योगेश चिपाडे यांच्याही अर्जाला अशाच कारणाने धक्का लागत बाद ठरविण्यात आला होता. गांधी आणि डॉ. चिपाडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निकाला औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले. न्यायमूर्ती एन. एम. जामदार यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत सुवेंद्र गांधी यांचा अर्ज वैध धरण्यात आला. डॉ. चिपाडे यांनाही खंडपीठात दिलासा मिळाला.

शिवसेनेचे गिरीश जाधव व विशाल खोटे यांनी औरंगाबाद खंडपीठाच्या या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ऍड. आनंद लांडगे यांच्यामार्फत न्यायालयात अपील दाखल केले आहे. गिरीश जाधव यांनी अपिलात भारतीय जनता पक्षाचे सुवेंद्र गांधी हे विद्यमान नगरसेवक आहेत. सरकारी जागेत त्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यांना नगरसेवक पदावरून अपात्र करावे. औरंगाबाद खंडपीठाने वैध ठरविलेला उमेदवारी अर्ज बाद करावा, अशी मागणी केली आहे. सर्वाच्च न्यायालयात हे प्रकरण गेल्याने आता गांधी व चिपाडे यांच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत. आता वरच्या न्यायालयात काय निर्णय होणार याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे.

अपिलावर बुधवारी सुनावणी
गिरीश जाधव आणि विशाल खोटे यांनी दाखल केलेल्या अपिलावर उद्या (गुरूवारी) सुनावणी होण्याची शक्‍यता आहे. सर्वोच्च न्यायालयातील अपिलावर बाजू मांडताना सुवेंद्र गांधी आणि डॉ. योगेश चिपाडे यांचा कस लागणार आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)