गांधी विद्यालयात बक्षीस वितरण

मंचर- येथील महात्मा गांधी विद्यालयात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण पार पडले. यावेळी पंचायत समिती सदस्य राजाराम बाणखेले आणि उद्योजक आशिष पुगलिया आदि मान्यवर उपस्थित होते. रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्ताने शाळेमध्ये वर्षभरात विविध उपक्रम व कार्यक्रमांचे नियोजन केलेले आहे. त्यामधील एक म्हणजे विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना चालना मिळण्यासाठी विविध स्पर्धेंचे आयोजन केले होते. यामध्ये इयत्ता पहिली ते दुसरीसाठी बडबडगीते, चित्रकला, हस्ताक्ष तर इयत्ता तिसरी व चौथीसाठी चित्रकला, रांगोळी, वक्‍तृत्व, निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यात 450 विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले होते, तर 66 विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्रक देण्यात आली. स्कूल कमिटी सदस्य राजाराम बाणखेले, आशिष पुंगलिया यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिपिका बी. सी. शेतसनदी, सूत्रसंचालन व आभार सोमनाथ इंदोरे यांनी मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)