गांधी जयंतीनिमित्त शहरात स्वच्छता अभियान

 

पिंपरी– महात्मा गांधी जयंती निमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत महापौर राहुल जाधव, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, आमदार लक्ष्मण जगताप, पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी भाग घेतला.

सकाळी आठ वाजता पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण व अभिवादन करुन या मोहिमेचा प्रारंभ झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यामागील मैदानाची स्वच्छता करुन रस्त्याच्या दोन्ही बाजूचे फुटपाथ साफ करण्यात आले. त्यानंतर गोकुळ हॉटेल रस्ता, इंदिरा गांधी उड्डाण पुलाचा परिसर स्वच्छ करण्यात आला. पिंपरीतील शगून चौकापासून डिलक्‍स थिएटर चौकापर्यंत सर्व पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी आणि सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी यांनी प्रत्यक्ष परिसराची साफसफाई करुन सहभाग घेतला. स्वच्छता मोहिमेत दोन टन कचरा उचलण्यात आला.

स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, नगरसेविका सीमा चौगुले, अनुराधा गोरखे, सीमा सावळे, आशा धायगुडे-शेंडगे, अश्‍विनी बोबडे, प्रियंका बारसे, नगरसेवक अंबरनाथ कांबळे, विलास मेडिगेरी, शितल शिंदे, रवी लांडगे, नामदेव ढाके, स्वीकृत सदस्य मोरेश्वर शेडगे, बाबू नायर, माउली थोरात, सागर हिंगणे, दिनेश यादव, विठ्ठल भोईर, माजी महापौर आर. एस. कुमार व विविध संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)