गुजरात- भाजप ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल करत असून, सध्या संपूर्ण देशात भाजपची लाट उसळली असल्याचे चित्र दिसून येत आहे. भाजप अध्यक्ष ‘अमित शहा’ देखील गांधीनगर या मतदारसंघांतून मोठ्या मतांनी निवडून आले आहेत.
देशभरामध्ये लोकसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहे. देशभरातील सर्वच लोकसभा मतदारसंघांमध्ये मतमोजणीची प्रक्रिया सुरू असून, लोकसभा मतदारसंघातील सुरुवातीचे कल सेना-भाजपच्या दिशेने असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा देशात भाजपच्या लाटेची जादू सर्वत्र पाहायला मिळत आहे.
Delhi: BJP President Amit Shah arrives at party Headquarters, welcomed by party workers. #ElectionResults2019 pic.twitter.com/5J9gYnmfu6
— ANI (@ANI) May 23, 2019