गांधीजींच्या सर्व विचारांशी मी सहमत नाही – कमल हसन

अभिनेता आणि नुकताच राजकारणात प्रवेश करणारा कमल हसन हा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अनेक विचारांचे अनुकरण करत असतो. त्याचे ट्‌विटर हॅंडल पाहिल्यास स्पष्ट होते की, तो गांधीजींच्या विचारांनी प्रभावित आहे. कमल हसन राजकारणात, सभेत किंवा देशाबद्‌दल बोलताना प्रत्येक वेळी गांधीजींचे विचार मांडत असतो. मात्र, “विश्‍वरूपम 2’च्या प्रमोशनल मुलाखतीत हसन म्हणाला, मी गांधीजींना माझा गुरू मानतो. पण त्यांच्या प्रत्येक विचाराशी मी सहमतच आहे असे नाही.

हसन म्हणाला की, मी गांधीजींचा चाहता आहे. मी त्यांना जीवनातील अदृश्‍य गुरू मानतो. मी गांधीजींकडून सर्वप्रकारच्या लॉजिकल आणि लॉजिस्टिकल सल्ले घेत असतो. मी त्यांचा खूपच सन्मान करतो. “एका माणसाने ठरविले तर तो जग बदलू शकतो’ हा त्यांचा विचार मला सर्वाधिक आवडतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पण मी गांधीजींच्या सर्वच विचारांशी सहमत नाही. गांधीजींना कधीच चित्रपट आवडत नव्हता, पण मला चित्रपट खूप आवडतात. त्यांच्या याच विचाराशी मी सहमत नाही. गांधीजींना चित्रपट कधीच समजला नाही. आनंदाने जीवन जगण्याबाबत ते खूपच गंभीर होते, असे मला वाटते.

दरम्यान, कमल हसन याचा “विश्‍वरूपम 2′ हा चित्रपट 10 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शेखर कपूर, राहुल बोस, पूजा कुमार, जयदीप अहलावत, वहीदा रहमान आणि अनंत महादेवन आदी कलाकार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)