गांधीजींच्या विचारानेच देश प्रगतीपथावर

राजगुरुनगर- देश महात्मा गांधीजींच्या विचाराने प्रगतीपथावर वाटचाल करीत असताना गांधीजींच्या विचारांवर आधारीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात स्वच्छ भारत संकल्पना राबवून खऱ्या अर्थाने गांधीजींच्या विचारांची चळवळ यशस्वी केली असल्याचे मत दिल्ली सुलभ इंटरनॅशनल संस्थेचे संचालक आणि शौचालय उभारणीचे संशोधक जनक म्हणून देशभरात ओळखले जाणारे पद्मभूषण डॉ. बिंदेश्‍वर पाठक यांनी राजगुरुनगर येथे व्यक्त केले.
घोडेगाव एकात्मिक आदिवासी विभागातंर्गत 13 आदिवासी शासकीय वसतिगृहातील निवासी मुला-मुलींसाठी राजगुरुनगर येथे एक दिवसीय रोजगार, आरोग्य, व्यक्तीमत्व विकास, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासाकरीता आयोजित कार्यशाळेतील सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पद्मभूषण डॉ. पाठक बोलत होते. यावेळी प्रकल्पाधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, प्रकल्पस्तरीय आढावा समिती अध्यक्ष संदिप साबळे, सदस्य गेनभाऊ वाजे, जनाबाई उगले, आदिवासी कृती समितीचे सिताराम जोशी, डॉ. संतोष सुपे, मुंबई सुलभ इंटर नॅशनलचे श्रीयुत झा, आखिल भारतीय विद्यार्थी सेनेच्या विद्या वत्सल, ऍड. किरण झिंजुरके, अनंत देशमुख आदिसह वसतिगृहातील अधिक्षक, अधीक्षिका, प्रकल्प कार्यालयातील अधिकारी, शिक्षकांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी देशाभरातील शौचालय उभारणीसाठी आपल्या भागात जनचळवळ उभ्या करुन काम करीत असलेल्या महिलांचा सत्कार वसतिगृहातील अधीक्षक महिलांच्या वतीने करण्यात आला. तर समारोपाला आदिवासी प्रकल्पातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, गुंणवंत विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करुन सत्कार केला. दिवसभर विद्या वत्सल यांच्या नेतृत्वाखाली मुला-मुलींची आरोग्य तपासणी अखिल भारतीर विद्यार्थी सेनेच्या वतीने 50 वैद्यकीय डॉक्‍टरांच्या पथकाने करुन मोफत औषधौपचार केले. एक कार्यशाळेचे नियोजन सहाय्यक प्रकल्पाधिकारी व्ही. डी. कालेकर, एम. बी. सुर्यवंशी के. बी. दाते यांनी केले. प्रास्ताविक सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले. सूत्रसंचालन गणेश गावडे तर सहाय्यक प्रकल्प अधिकारी व्ही. आर. देसाई यांनी आभार मानले.

  • मलमुत्रापासून पाणी तयार करण्याचे प्रात्यक्षिक
    सुलभ इंटरनॅंशनल देशाभरात शौचालयाची चळवळ सुरु कशी झाली याचा इतिहास सांगताना बिंदेश्‍वर पाठक म्हणाले की, शौचालये उभारताना नवीन प्रयोग करुन हाताने मैला साफ करणाऱ्या माणसांची सुटका होऊन ग्रामीण भागातील शेतीसाठी सोनखते तयार केली जात आहे. तसेच स्वंयपाकासाठी गॅस मिळून, पाण्याचा वापर कमी होऊन आरोग्याच्या अनेक समस्या कमी होऊ लागल्या आहे. सर्वसामान्य माणसांना आपल्यासाठी शौचालये बांधण्यासाठी कमी खर्च यावा म्हणून वेगवेगळ्या भागाचा अभ्यास करुन मॉडेल तयार केली. तसेच या शिबिरात देशभरातील शौचालय युनिटची डमी मॉडेल आणि शौचालय मलमुत्रापासून तयार केलेले पाणी प्रात्येक्षिक पद्मभूषण डॉ. बिंदेश्‍वर पाठक दाखवली.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)