गांधीजींच्या विचारांना संपवण्याचा सरकारचा डाव-धनंजय मुंडें

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी गांधी जयंतीदिनी ग्रामसभा रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयावर टीका केली आहे. ज्या गांधीजींनी गावे समृद्ध आणि सक्षम करण्याचा विचार या देशाला दिला. त्या गांधीजींच्या जयंतीदिनी आयोजित केली जाणारी ग्रामसभा का रद्द करण्यात आली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच गांधी विचारांना संपवण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला.

धनंजय मुंडे यांनी ट्विट करत सरकारच्या या निर्णयाचा निषेध व्यक्त केला. तसेच सरकारच्या निर्णयाची प्रत ट्विटरवर शेअर करत त्यांच्या भूमिकेवर टीका केली. राष्ट्रीय दिनी ग्रामसभा न घेण्याचा निर्णय अनाकलनीय आणि निषेधार्ह आहे. ज्या गांधीजींनी गावे समृद्ध आणि सक्षम करण्याचा विचार या देशाला दिला त्या गांधीजींच्या जयंती दिनी आयोजित केली जाणारी ग्रामसभा का रद्द करण्यात आली. गांधी विचारांना संपवण्याचा हा डाव आहे. सरकारचा जाहीर निषेध, असे त्यांनी म्हटले.दरम्यान, सततच्या होणाऱ्या ग्रामसभांमुळे ग्रामस्थांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्टीकरण सरकारच्या वतीने देण्यात आले आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)