गांधीजयंतीनिमीत्त राजकीय जोर बैठका

सातारा जिल्हयात भाजप विरूद्ध राष्ट्रवादी सामना
सातारा – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 149 व्या जयंतीदिनी सातारा जिल्हयात भाजप विरूद्ध राष्ट्रवादी अशा जोरदार राजकीय जोर बैठका रंगल्या. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राष्ट्रवादीने कराडात मूक आंदोलन ल भाजप ने साताऱ्यात सातारा विधानसभा मतदारसंघाची चाचपणी केली.

सोमवार पेठेतील फुटका तलाव येथे गजानन मंगल कार्यालयात पाचशे कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण शिबिर भाजपचे संघटक दीपक पवार यांच्या नेतृत्वाखाली पार पडले . सातारा विधानसभा मतदार संघातील 432 बूथपैकी 123 बूथचे सदस्य प्रशिक्षणाला उपस्थित होते . या बैठकीत अध्यक्षीय भाषणात दीपक पवार यांनी सातारा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेउन कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आदेश दिले . एकूण बूथ कमिटयांची यादी निश्‍चित करण्यात आली . या बैठकीला भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर अमित कुलकर्णी दत्ताजी थोरात धनंजय जांभळे सिध्दी पवार प्राची शहाणे, आशा पंडित, मिलिंद काकडे , विजय काटवटे उपस्थित होते.

-Ads-

बी जे पी शासनाच्या विरोधामध्ये पेट्रोल डिझेल ग्यास दरवाढीच्या विरोधामध्ये कराडात राष्ट्रवादीने महात्मा गांधी पुतळ्या जवळ राष्ट्रवादी पार्टीच्या वतीने व राष्ट्रवादी सेवादल अल्पसंखसंख युवक महिला व विधार्थी व विविध सेलच्या वतीने आमदार बाळासाहेब पाटील व सातारा जिल्हा राष्ट्रवादी पार्टी अध्यक्ष सुनील माने यांच्या नेतृत्व खाली मूक आंदोलन काळ्या फिती लावून आंदोलने करण्यात आले.

यावेळी प्रदेश राष्ट्रवादी पार्टी उपाध्यक्ष अविनाश मोहिते प्रदेश सेवादल मुख्यसंघटक राजेंद्र लावंघरे प्रदेश सेवादल महिला संघटिका सीमा जाधव प्रदेश अतिरिक्त महिला सेवादल संघटिका दीपिका घाडगे मॅडम माझी सभापती देवराज पाटील मानसिंगराव जगदाळे अल्पसंखांख अध्यक्ष शाफिक शेख सातारा जिल्हा सेवादल अध्यक्ष पांडुरंग पोतेकर मीरा बोरगावे संजय जगदाळे सचिन बेलागडे सभापती, विविध सेलचे अध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते कराड येथे या आंदोलनात उपस्थित होते.

एकीकडे साताऱ्यात थोरल्या पवारांनी आधी खासदार उदयनराजे यांची केलेली पाठराखण आणि नंतर पुण्यात एका सभेत महाराज लोकांना दिलेल्या कानपिचक्‍या यामुळे लोकसभेत राष्ट्रवादीचा उमेदवार कोण ? हा राजकीय सस्पेन्स वाढला आहे. तर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सातारा जिल्ह्यातील बूथप्रमुखांना विधानसभा मतदारसंघनिहाय कामाला लागण्याची पत्रे पाठवली आहेत. आणि भाजपच्या साताऱ्याच्या उमेदवारीवर दादांनीच राजकीय गुळणी पकडली आहे. युतीच्या प्रोटोकॉलमध्ये साताऱ्याची लोकसभेची जागा शिवसेनेकडे आहे तर त्यांनी स्वबळाची भाषा करताना भाजपची मंडळी पुन्हा युतीचे तुणतुणे वाजवू लागली आहेत . उदयनराजे या फॅक्‍टर वरच राष्ट्रवादी व भाजपची बरीचशी राजकीय गणिते ठरणार असल्याची राजकीय चिन्हे आहेत .


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)