गांडूळखत विक्रीतून 30 हजाराचे उत्पन्न

ओगलेवाडी – हजारमाची, ता. कराड ग्रामपंचायतीच्या माध्यमातून स्वच्छता मोहिमेंतर्गत उभारलेल्या गांडूळखत प्रकल्पातून एका वर्षात सुमारे अडीच टन गांडूळ खताची निर्मिती करण्यात आली आहे. या गांडूळखताच्या विक्रीतून ग्रामपंचायतीस 30 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले असून ग्रामपंचायतीने राबविलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

हजारमाची ग्रामपंचायतीच्या वतीने घंटागाड्यांच्या माध्यमातून गावातील कचऱ्याचे संकलन केले जात आहे. कचरा गाड्यांमधून संकलित होणारा सर्व कचरा ग्रामपंचायतीच्या कचरा डेपोवर टाकण्यात येत होता. मात्र गतवर्षी स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीने सदाशिवगडाच्या पायथ्याला गांडूळखत प्रकल्प उभारला. गांडूळ खत निर्मिती करण्यासाठी घंटागाड्यांच्या माध्यमातून ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित करण्यात येऊ लागला. ओल्या कचऱ्यापासून गांडूळ खताची निर्मिती केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सरपंच नंदा इंगळे व उपसरपंच सतीश पवार यांच्या हस्ते शेतकऱ्यांना खताचे वितरण करण्यात आले. पोलीस पाटील मुकुंदराव कदम, किल्ले सदाशिवगड सोसायटीचे चेअरमन जयंत पवार, कराड खरेदी-विक्री संघाचे संचालक प्रकाश पवार, ग्रामपंचायत सदस्य सतीश जांभळे, सूर्यभान माने, सर्जेराव पानवळ, गणेश घबाडे, स्वाती जाधव, रुपाली गायकवाड, दीपक लिमकर, सतीश पाटील, शरद कदम, पराग रामुगडे, जयवंत विरकायदे, नितीन आवळे, कल्याण डुबल, निवासराव डुबल, अतुल पवार, उदय सावळेकर ग्रामसेवक अरुण गायकवाड, ग्रामस्थ व कर्मचारी उपस्थित होते.

गावातून दररोज संकलित होणाऱ्या कचऱ्यापासून गांडूळखत तयार करुन या माध्यमातून ग्रामपंचायतीस उत्पन्न मिळत असून हा गांडूळखत प्रकल्प अधिक क्षमतेने चालवण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे उपसरपंच सतीश पवार यांनी सांगीतले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)