गांजे येथे घराला भीषण आग

26 लाखाचे साहित्य जळून खाक
मेढा, दि. 12 (प्रतिनिधी) – गांजे, ता. जावली येथे बुधवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास येथील शांताराम गुरव यांच्या राहत्या घराला अचानक आग लागल्याने संपूर्ण घर जळून खाक झाले. यात भांडी कुंडी, कपडेलत्ता, फर्निचर, सोन्या-चांदीचे दागिने, गवत असे अंदाजे सव्वीस लाख रूपयाचे साहित्य जळून खाक झाल्याची माहिती महसुल विभागाचे डी. एन. आंबवणे यांनी दिली आहे.
गांजे येथील शांताराम परशुराम गुरव, मारूती परशुराम गुरव व ज्ञानेश्वर परशुराम गुरव हे तिन्ही बंधू एकत्र रहात असून बुधवारी पहाटे घराला लागलेल्या आगीमुळे गुरव कुटूबांवर मोठे संकट निर्माण झाले आहे. स्थानिक ग्रामस्थांनी ही आग विझवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. पंरतु, आग तातडीने आटोक्‍यात आली नसल्याने संपुर्ण घर आगीत जळून खाक झाले आहे. हा परिवार शांताराम, मारूती व ज्ञानेश्वर या तीन बंधुंचा संयुक्त परिवार असलेने घरामध्ये मोठ्या प्रमाणात संसारोपयोगी साहित्य होते. सर्व साहित्य धान्य, कपडे, भांडी, फर्निचर, सोने, दागिने, किरकोळ घरगुती साहित्य, इलेक्‍ट्रॉनिक वस्तू इ. सर्व साहित्य जळून खाक झाल्याने गुुरव कुटूंबियांचा संसार उघड्यावर पडला आहे. यामध्ये गुरव कुटुंबाच्या दोन गाई वाचवण्यात यश आले असून जीवितहानी काहीही झालेली नाही. दरम्यान अतिरिक्त गटविकास अधिकारी संताजी पाटील यांनी भेट देवून घरकूल देण्याचे आश्वासन दिले. तसेच जेवढे सहकार्य करता येईल तेवढे करा अशा सुचना ग्रामसेवक के एस माने यांना दिल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)