गांजा बाळगणारे चौघे जेरबंद

30 किलो 420 ग्रॅम गांजा जप्त : अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

पुणे – बेकायदेशीरपणे गांजा बाळगणाऱ्या चौघांना गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून 30 किलो 420 ग्रॅम वजनाचा 4 लाख 56 हजार 300 रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, त्या चौघांना 4 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
संतोष निवृत्ती ननावरे (वय 26), विशाल विलास माळी (वय 25), योगेश ऊर्फ जॉकी अशोक वाघमारे (वय 31, तिघेही, रा. पंढरपूर, जि. सोलापूर) आणि नितीन दिनकर साळेकर (वय 32, रा. शिरवळ, ता. खंडाळा, जि. सातारा) अशी पोलीस कोठडी झालेल्या चौघांची नावे आहेत. याबाबत अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सहायक पोलीस फौजदार ए.एम.शिंदे यांनी वारजे पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. वारजे येथून उत्तमनगरकडे जाणाऱ्या पाटील वाईन्स समोरील सार्वजनिक रस्त्यावर पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांना टाटा व्हिस्टा गाडी संशियितरित्या थांबलेली दिसली. पोलिसांनी गाडीची झडती घेतली असता डिक्कीत पोत्यात गांजा आढळून आला. या प्रकरणात पोलिसांनी चौघांना अटक करून न्यायालयात हजर केले. त्यावेळी त्यांनी हा गांजा कोठून आणला. त्याचे काय करणार होते. याचा मुख्य सूत्रधार कोण आहे, याचा शोध घेण्यासाठी चौघांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकिलांनी केली. त्यानुसार न्यायालयाने चौघांना पोलीस कोठडी सुनावली.
अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक पोलीस आयुक्त नीलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक सुनील दोरगे, पोलीस कर्मचारी अविनाश शिंदे, प्रफुल साबळे, मनोज साळुंके, हेमंत वाघमारे, राहुल जोशी, महेंद्र पवार, विठ्ठल खिलारे, सचिन चंदन यांनी ही कारवाई केली.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)