गहूच आहे अनारोग्याचे कारण

आपल्या रोजच्या आहाराचा अविभाज्य भाग असलेला गहू हाच अनेक समस्यांचे मूळ असल्याचे संशोधनातून आढळून आले आहे. आपण अस्सल अन्नापासून हळूहळू दूर गेलो आहोत. त्याविषयी…

तुम्हाला माहिती आहे का, की गव्हामुळे तुमच्या रक्‍तातली साखर अत्यंत नाट्यमयरीत्या वाढते. खरं तर, “स्निकर्स’च्या एका बारमुळे रक्‍तातली साखर जेवढी वाढेल, त्यापेक्षा जास्त गव्हाच्या ब्रेडच्या दोन स्लाईसेसमुळे वाढते. त्यामुळे अशा लोकांनी जेव्हा लोकांनी गहू खाणं बंद केलं तेव्हा त्यांचं वजन (विशेषतः पोटावर) खूप मोठ्या प्रमाणात घटलं, यात काही नवल नाही.
गहू सोडल्यानंतर पहिल्या महिन्यात लोकांचा जाडेपणा अनेक इंचांनी कमी होऊ शकतो. अमेरिकेतील संशोधक डॉ. विल्यम डेव्हिस यांनी 12 वर्षे “गहू आणि त्याचे मानवी शरीरावरील परिणाम’ या विषयावर संशोधन केलं. त्यादरम्यान त्यांनी रुग्णांच्या हृदयविकाराची कारणं तपासली.

त्यातून जे काही शोध लागले ते त्यांच्या न्यूयॉर्क टाइम्स बेस्ट-सेलिंग व्हीट बेली ह्या पुस्तकात उघड केले आहेत. आपल्या बऱ्याच शारीरिक समस्या, हृदयविकार, मधुमेह आणि लठ्ठपणा या आपल्या गहू खाण्यामुळे उद्‌भवतात, असे डॉ. विल्यम डेव्हिस यांनी या पुस्तकात म्हटलं आहे. आहारातून गहू काढून टाकल्यामुळे आपलं आयुष्य बदलू शकतं.

व्हीट बेली काय आहे?
गव्हामुळे तुमच्या रक्‍तातली साखर अत्यंत नाट्यमयरीत्या वाढते. डॉ. विल्यम डेव्हिस सांगतात, गहू आणि बऱ्याचशा इतर आरोग्यविषयक समस्यांचा संबंध मोठा आहे. माझ्या रुग्णांपैकी ऐंशी टक्‍के रुग्णांना मधुमेह किंवा मधुमेहापूर्वीची स्थिती होती. मला माहिती होतं की, इतर कशाहीपेक्षा गव्हामुळे रक्‍तातली साखर खूप जास्त वाढते, म्हणून मग मी त्यांच्या आहारातून गहू काढून टाकला आणि त्याचा रुग्णाच्या रक्‍तातल्या साखरेवर काय परिणाम होतो, हे पाहिले. किमान 3 ते 4 महिन्यांनंतर मला असे रिपोर्टस मिळाले की, त्यांच्या रक्‍तातली साखर खूपच कमी झालेली असे.
पण त्यांच्या या इतर प्रतिक्रियासुद्धा असत. मी आहारातून गहू काढून टाकला आणि माझं वजन 10 पौंडांनी कमी झालं. काही जण म्हणत की, माझा दमा इतका बरा झाला की, मी माझे दोन इन्हेलर्स फेकून दिले.
मागील किमान 30 वर्षें अर्धशिशीमुळे ज्यांचं डोकं रोज दुखायचं, ते तीन दिवसांत दुखायचं बंद झालं. तसेच अशा रुग्णाच्या छातीतली जळजळ थांबली.
एका रुग्णाचा इरिटेबल बाउल सिंड्रोम हा आजार सुधारला, एकाचा अल्सरेटिव्ह कोलायटिस, तर आणखी एकाचा रुमॅटॉइड आर्थ्रायटिस, मूड, झोप, सगळंच कमी झालं.

कशापासून बनला आहे गहू?
जर गहू कशापासून बनलेला आहे हे बघितलं, तर त्यात ऍमलोपेक्‍टिन ए चा समावेश होतो, जे केमिकल फक्‍त गव्हातच आढळून येतं, आणि जे रक्‍तातल्या लहान एलडीएल पार्टिकल्सचं प्रमाण खूप वाढवतं जे की हृदयविकाराचं सर्वात मुख्य कारण आहे.

जेव्हा आहारातून गहू काढून टाकला जातो, तेव्हा या लहान एलडीएलची पातळी 80 ते 90 टक्‍क्‍यांनी खाली येते. गव्हामध्ये खूप जास्त प्रमाणात ग्लायडिन असतं, जे एक भूक वाढवणारं प्रथिन आहे. गहू खाल्ल्यामुळे सर्वसाधारण व्यक्‍तीचा कॅलरी इन्टेक दिवसाला 400 कॅलरीजने वाढतो.

ग्लायडिनचे अफूसारखे गुणधर्मदेखील असतात ज्यामुळे त्याचं व्यसन लागू शकतं. अन्नविषयक शास्त्रज्ञांना हे जवळजवळ 20 वर्षांपासून माहीत आहे. मात्र, आजवर या विषयावर बोलण्याचे धाडस जुनीच केलं नव्हतं. कारण अज्ञात आहे.
गहू-मुक्‍त आहार करणं हे ग्लुटन-मुक्‍त आहार करण्यासारखंच आहे का?
ग्लुटन हा गव्हाचा फक्‍त एक घटक आहे. गव्हातून ग्लुटन काढून टाकलं तरी गहू तितकाच वाईट असेल कारण त्यात अजूनही ग्लायडिन आणि ऍमलोपेक्‍टिन ए, तसंच इतर अनेक अनुचित घटक असतील.
ग्लुटन-मुक्‍त उत्पादनं प्राथमिक घटकांपासून बनलेली असतात. कॉर्न स्टार्च, राईस स्टार्च, टॅपिओका स्टार्च किंवा पोटॅटो स्टार्च. आणि हे सुकवलेले, पावडरच्या स्वरूपातले स्टार्च असे पदार्थ आहेत जे रक्‍तातली साखर अजूनच जास्त वाढवतात.
डॉ. डेव्हिस म्हणतात की, आपण अस्सल आणि नैसर्गिक अन्नापासून दूर गेलो आहोत. म्हणून मी लोकांना अस्सल अन्नाकडे परतण्यास प्रोत्साहित करतो.

कोणते आहे अस्सल अन्न?
फळं,
भाज्या,
कठीण कवचाची फळं आणि बिया अनपाश्‍चराईज्ड चीज
अंडी आणि मांस
हायब्रिडायजेशनसारख्या उत्पादन वाढवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अनेक तंत्रांमुळे आणि 70-80 च्या दशकात गव्हाचं स्वरूप खरोखर बदललं. गव्हाचा दाणा अधिक छोटा आणि अधिक पुष्ट झाला आणि त्यात ग्लायडिनचे प्रमाण वाढले. ग्लायडिन हा एक प्रभावी असा भूक वाढवणारा घटक आहे.
आज आपण जो गहू खातो तो 100 वर्षांपूर्वी खाल्ल्या जाणाऱ्या गव्हासारखा
दर्जेदार नाही आहे.
तुम्ही दररोज ब्रेड/ पास्ता/ चपात्या खायचं बंद केलंत आणि चिकन आणि भाज्यांसोबत भात खाऊ लागलात, तरीसुद्धा तुमचं वजन कमी होईल. कारण तांदूळ रक्‍तातली साखर गव्हाइतकी वाढवत नाही, आणि त्यात ऍमलोपेक्‍टिन ए आणि ग्लायडिन सारखे भूक वाढवणारे घटक नसतात. गव्हामुळे जशी कॅलरी इन्टेकमध्ये वाढ होते तशी तांदळामुळे होणार नाही.
काही विदेशी संस्कृतींमधले लोक जे गहू खात नाहीत ते यामुळेच अधिक सडपातळ आणि निरोगी असतात. प्रत्येकाने गहू खाणं थांबवलं पाहिजे. ही एक अशी गोष्ट आहे जी, मला पक्कं माहीत आहे की तुमचं आयुष्य बदलून टाकेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)