गश्मीर महाजनी साजरा करतो इको-फ्रेंडली गणेशोत्सव

घरच्या गणपती बद्दल सांगताना गश्मीर महाजनी म्हणतो, ”माझ्या आजोबांपासून आमच्या घरी गणपती बाप्पाचे पाच दिवसांसाठी आगमन होते. आमच्या घरी इको-फ्रेंडली गणेशोत्सव साजरा होतो. साधेचं डेकोरेशन करण्यावर आमचा भर असतो. आईच्या हातचे उकडीचे मोदक खायला माझी मित्रमंडळी येतात. पण मला मात्र उकडीचे मोदक अजिबात आवडत नाहीत. त्यामूळे मी बाकीच्या स्वादिष्ट भोजनावर ताव मारतो. माझी डान्स ऍकेडमी सुरू झाल्यापासून त्याचेही विद्यार्थी गणेशोत्सवाच्या काळात आवर्जून घरी येतात. आणि घर अगदी भरलेलं असतं. ”

 

कितीही काम असलं तरीही मी गणेशोत्सवाच्या काळात घरीच सुट्टी घेऊन राहण्यावर भर देतो. गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करणं आणि त्याचे षोडशोपचारे पूजन करणं मला खूप आवडते. यंदा बाप्पाच्या आशिर्वादाने एका इंटरनैशनल प्रोजेक्टवर गणेशोत्सावाच्या काळातच काम सुरू करतोय – गश्मीर महाजनी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)