गव्हाचे भाव पडल्याने बिहारमधील शेतकरी अडचणीत; मदतीची मागणी

नवी दिल्ली : उत्पादित केलेला गहू १,४००-१,५०० रु. क्विंटल दराने विकण्यासाठी बिहारमधील शेतकऱ्यांवर दबाव टाकला जात आहे. तर, दुसरीकडे केंद्र शासनाने गव्हासाठी १,७३५ रु.क्विंटल अशी किमान आधारभूत किंमत जाहीर केली आहे.

बिहारमध्ये गव्हाची खरेदी प्रक्रिया १ मे पासून सुरू करण्यात आली आहे. देशभरात रब्बी विपणन हंगाम १ एप्रिल पासून सुरू झाला आहे. तर, मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरातमधील काही भागातील शासकीय खरेदी संस्थांनी गहू खरेदी १५ मार्चलाच सुरू केली होती. त्यामुळे गव्हाची काढणी थोडी लवकर करावी लागली होती.

बिहारमधील गुलाबबाग येथील बाजारात चांगल्या दर्जाच्या गव्हाला १,५०० रु./क्विंटलचा भाव मिळाला. तर मध्यम दर्जाच्या गव्हाचे भाव १,४०० रु./१०० किलो असे राहिले. राज्यात भरघोस झालेले गहू उत्पादन आणि सातत्याने सुरू असलेला पुरवठा, यामुळे गव्हाचे भाव पडले आहेत. त्यामुळे या संकटातून सावरण्यासाठी शेतकऱ्यांनी मदतीची मागणी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)