गवळी गॅंगच्या दोघांवर खंडणीचा गुन्हा

मंचर – आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागातील लोणी येथील एका ताडी दुकानदाराला 40 हजार रूपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गवळी गॅंगच्या दोन जणांवर मंचर पोलिसांनी गुरूवारी (दि. 26) रात्री गुन्हा दाखल केला आहे. संबंधित आरोपींना मंचर पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या दहा दिवसांत गवळी टोळीच्या विरोधात खंडणीचे तीन गुन्हे दाखल झाले आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांनी दिली.

लोणी गावानजीक वडगांवपीर आहे. वडगांवपीर गावची यात्रा 11 मार्च रोजी झाली. त्यानंतर सात ते आठ दिवसांनी लोणी येथील ताडी दुकानात सायंकाळी चारच्या सुमारास सूरज यादव आला. मोबीनभाईने चाळीस हजार रूपये मागितले आहे. ते पैसे द्या, अन्यथा तुमच्या दुकानाची मोडतोड होईल. आणि दुकान पुन्हा सुरू करू देणार नाही, असा दम दिला. त्यानंतर दोन तीन दिवसांनी दुपारी दोनच्या सुमारास सूरज यादव पुन्हा ताडीच्या दुकानात आला.

मोमीनभाईने पैसे मागितले आहे. पैशांची व्यवस्था करा.असा दम दिला. त्यानंतर पुन्हा 24 मार्च रोजी सायंकाळी सहाच्या दरम्यान ताडी दुकानात सूरज आला. संध्याकाळपर्यंत मोबीनभाईने पैशाची व्यवस्था करावयास सागितली आहे. जर पैसे दिले नाही तर दुकानाची तोडफोड करू. इतर दुकानदारांची जशी तोडफोड केली तशी गत होईल, अशी धमकी दिली. त्यानंतर संबंधित दुकानदाराने रात्री सातच्या सुमारास चायनीज दुकानात बसलेल्या सूरज यादव आणि मोबीन मुजावर यांना तीस हजार रूपये रोख दिले.

यासंदर्भात मंचर पोलीस ठाण्यात मोबीन मुजावर आणि सूरज यादव यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अर्जुन शिंदे करत आहे. गेल्या दहा दिवसांत गवळी टोळीच्या विरोधात एकूण खंडणीचे तीन गुन्हे दाखल झाले आहेत. त्यानुसार एकूण 9 आरोपी आणि इतर दोन ते तीन अनोळखी व्यक्‍ती यांच्याविरोधात मंचर पोलिसांनी खंडणीबाबत कारवाई केली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)