गळित हंगाम संपतानाही होणार वजन काट्यांची तपासणी

File Photo

जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे गाळप नियोजन सद्यस्थिती

कारखाना गाळप क्षमता (प्रतिदिन) हंगाम
सोमेश्‍वर सहकारी — 5000 मेट्रीक टनक्षेत्रातील ऊस संपेपर्यंत सुरू राहणार
माळेगाव सहकारी — 5000 मेट्रीक टनक्षेत्रातील ऊस संपेपर्यंत सुरू राहणार
छत्रपती सहकारी — 3,500 मेट्रीक टन क्षेत्रातील ऊस संपेपर्यंत सुरू राहणार
विघ्नहर सहकारी — 5000 मेट्रीक टन क्षेत्रातील ऊस संपेपर्यंत सुरू राहणार
संत तुकाराम सहकारी — 2,500 मेट्रीक टन अंतिम टप्यात
भीमाशंकर सहकारी — 2,500 मेट्रीक टन क्षेत्रातील ऊस संपेपर्यंत सुरू राहणार
घोडगंगा सहकारी — 5000 मेट्रीक टन क्षेत्रातील ऊस संपेपर्यंत सुरू राहणार
नीराभीमा सहकारी — 5000 मेट्रीक टन अंतिम टप्यातील नियोजन
कर्मयोगी सहकारी — 5000 मेट्रीक टन अंतिम टप्यातील नियोजन
भीमापाटस सहकारी — 5000 मेट्रीक टन अंतिम टप्यातील नियोजन
दौंड शुगर प्रा.लि. — 2,500 मेट्रीक टन अंतिम टप्यात
अनुराज शुगर — 2,500 मेट्रीक टन अंतिम टप्यात
श्रीनाथ म्हस्कोबा — 3,500 मेट्रीक टनअंतिम टप्यात

साखर कारखान्यांच्या नियोजनावर शासकीय यंत्रणेचे कडक लक्ष

पुणे – महाराष्ट्रातील गळित हंगाम अखेरच्या टप्यात आल्यानंतर सर्वच साखर कारखान्यांमधील उसाच्या वजन काट्याच्या तपासणी साठी सर्वत्र भरारी पथकं कार्यान्वित करून रवाना करण्यात आली आहेत. राज्यातील 187 कारखान्यांपैकी 185 कारखान्यांची अचानक तपासणी करण्यात आली असून पुणे जिल्ह्यातील कारखान्यांची तपासणी दुसऱ्या टप्यात अचानक करण्यात येत आहे. कारखान्यात कुठल्याही वेळी अशी तपासणी करण्यात यावी, असे आदेश सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिले असल्याने तपासणीचे कामकाजही जोरदार सुरू आहे.

राज्य शासनाकडून पहिल्या आणि दुसऱ्या टप्यात वजन काट्यांची तपासणी करण्यात येत आहे. राज्यातील गळित हंगाम अंतिम टप्यात आला असताना 31 साखर कारखाने बंदही झाले आहेत. परंतु, पुणे जिल्ह्यासह सातारा, सांगली आणि कोल्हापुरातील साखर कारखान्यांची धुराडी अद्यापही धगधगत आहेत. पश्‍चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा साखर उत्पादनात मोठा वाटा असल्याने येथील साखर कारखान्यांत असलेल्या वजन काट्यांची दुसऱ्या टप्यातही तपसणी करण्यात येणार आहे.
कार्यक्षेत्रातील ऊसाचे संपूर्ण गाळप करण्यात काही कारखाने अयश्‍वी ठरतात, किंवा अखरेच्या टप्यात नियोजना अभावी संपुर्ण उसाचे गाळप होवू शकत नाही. गाळप क्षमतेअभावी उस शिल्लक राहत असल्याचीही अनेक उदाहरणे समोर आली आहेत. यामुळेच वजन काट्यची तपासणी करताना कारखान्याच्या कार्यक्षेत्रात नोंद झालेला ऊस तसेच वजना काट्यावर नोंद झालेला एकूण ऊस याची तपासणी करून कारखान्याच्या गाळप क्षमतेविषयीही अभ्यास केला जाणार आहे. याच कारणास्तव राज्यातील सर्वच्या सर्व 187 साखर कारखान्यांतील वजन काट्यांची तपासणी करण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत.

महाराष्ट्रात उत्पादित होणाऱ्या साखर उत्पादनात पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा 25 ते 30 टक्के वाटा असतो. जिल्ह्यातील कारखान्यांचे गाळप हंगाम नियोजनही अभ्यासपूर्ण असते, त्यानुसार शेतकऱ्यांनाही त्यांच्या उसाचा मोबदला दिला जावा. वजनकाट्या विषयी कुठल्या तक्रारी राहू नयेत, याकरिता शासकीय पातळीवरही गांभीर्याने प्रयत्न केले जात असून याच पार्श्‍वभुमीवर कारखान्यांतील वजन काट्यांची दुसऱ्यांदा तपासणी केली जात आहे. पहिल्या टप्यात करण्यात पथकांकडून करण्यात आलेल्या तपासणीत कोणत्याही साखर कारखान्याच्या वजन काट्यांच्या यंत्रणेत कोणत्याही मोठ्या त्रुटी आढळल्या नाहीत. या भरारी पथकांना महिन्यातून एकदा अचानक तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यानुसार या पथकांनी नियोजन केले असून दुसऱ्या टप्यातील कामकाजही वेगाने सुरू झाल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)