गळफास लावून आढले बुद्रुक येथे एकाची आत्महत्या

तळेगाव दाभाडे – शेतातील आंब्याच्या झाडाच्या फांदीला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून एका तरुणाने आत्महत्या केली. आढले बुद्रुक (ता. मावळ) येथे सोमवारी (दि. 3) सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. आत्महत्येचे कारण अद्यापही समजले नाही.

काळूराम ज्ञानेश्‍वर पोकळे (वय 32, रा. आढळे बुद्रुक, ता. मावळ) आत्महत्या केलेल्या व्यक्‍तीचे नाव आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुदास जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत काळूराम पोकळे यांने त्यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाच्या फांदीला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. खबर मयताचा भाऊ विश्‍वनाथ पोकळे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यामध्ये दिली. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक इम्रान मुल्ला व कर्मचारी राकेश पलांडे यांनी धाव घेवून पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेहाचे शवविच्छेदन वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण कानडे यांनी केले. मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

-Ads-

आत्महत्येचे कारण अद्यापही समजले नसून, गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक इम्रान मुल्ला करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)