गर्भवती महिलांच्या आहार जनजागृतीसाठी लायन्सचा पुढाकार

पुणे – महाराष्ट्रातील अनेक आदिवासी भागत कुपोषणामुळे बळी जाणाऱ्या चिमुकल्यांची संख्या वाढत आहे. तसेच, अनेकदा खेड्यापाड्यात गर्भवती महिलांना पोषक आहार न मिळाल्यामुळे जन्मलेली मुले कुपोषीत असतात. त्यामुळे अशा मुलांच्या शारिरीक विकासासाठी आणि प्राथमिक शिक्षणासाठी तसेच गर्भवती महिलांच्या आहार जनजागृतीसाठी लायन्स क्‍लबने पुढाकार घेतला आहे. लायन्स क्‍लब इंटरनॅशनलतर्फे पुण्यासह राज्यभरातील 100 अंगणवाड्या दत्तक घेण्यात आल्या आहेत. याशिवाय महाराष्ट्रातील गर्भवती महिलांसाठी जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)