गर्भलिंग निदानचा गोरख धंदा!

  • वैद्यकीय विभागाची चिडीचूप : छुप्या मार्गाने गर्भलिंग निदान सुरूच

वडगाव-मावळ, (वार्ताहर) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “बेटी बचाव; बेटी पढाव’ चा नारा दिला असूनही मावळ तालुक्‍यात छुप्या मार्गाने गर्भलिंग निदान होत आहे. पूर्वी ज्यांच्या सोनोग्राफी केंद्रावर गुन्हे दाखल झाले, त्यांचाच यात समावेश आहे. केवळ आर्थिक हव्यासापोटी मावळातील काही दलाल पुणे जिल्ह्यातील कुटुंबियांकडून हजारो रुपये घेवून गर्भलिंग निदान करत आहेत. मावळ तालुक्‍यातील वैद्यकीय विभागाला याचा पत्ताच नाही. या केंद्रावर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली.

मावळ तालुक्‍यात देहुरोड, तळेगाव-दाभाडे, वडगाव, कामशेत व लोणावळा आदी ठिकाणी हजारोंच्या रकमा स्वीकारून गर्भलिंग निदान करून स्त्रीभ्रूणहत्या केली जाते. अर्भक शौचालयाच्या टाकीत फेकून देतात. त्या स्त्रीला अज्ञातस्थळी ठेवण्यात येते. काही वेळा महिलांचा मृत्यूही होण्याची शक्‍यता असते. ही सोनोग्राफी केंद्र वर्दळीच्या ठिकाणी असून त्या केंद्रातील डॉक्‍टर व कर्मचारी कमालीची गुप्तता पाळतात.

तसेच त्या महिलेची कोणतीही कागदोपत्री नोंद ठेवली जात नाही. त्या केंद्रातील इतर कर्मचाऱ्यांनाही पैसे दिले जातात. त्यामुळे ते कर्मचारी त्यांच्या परिसरातील ज्यांना मुलगाच हवा अशांना सोनोग्राफी केंद्रात आणून त्यांची तपासणी करुन स्त्रीभ्रूणाची हत्या केली जाते. स्वतः महिला डॉक्‍टर असून कार्य स्त्रीभ्रूणहत्या करण्याचे करत आहे. यात सुशिक्षितांचा समावेश अधिक आहे. डॉक्‍टर त्यांच्या पेशाला बदनाम करत आहे.

मावळात गर्भलिंग निदान व स्त्रीभ्रूणहत्या करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करून दोषींवर कडक कारवाई केव्हा होणार, असा सवाल उपस्थित होत आहे. सोनोग्राफी केंद्रात 24 तास सीसीटीव्ही कॅमेरे लावून त्यांचे फुटेज दैनंदिन तपासून दोषी सोनोग्राफी केंद्र चालकांवर कडक कारवाई करावी, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)