गर्भधारणा आणि मधुमेह (भाग-१ )

मातृत्व म्हणजे जणू आनंदाचा मुकुट परिधान करणे, स्त्रीत्वाचा सर्वांत मोठा सन्मान असं चित्र रंगवलं जात असले तरी हेच मातृत्व त्याच्या काही समस्यांसोबतच येते. ज्यामुळे नव्याने आई झालेल्या स्त्रीला अपयश आल्याप्रमाणे नैराश्‍य येऊ शकते आणि तिच्या क्षमता आणि निर्णयांविषयी तिला असुरक्षित वाटू शकते. या विषयावर केलेली चर्चा…

मातृत्व हा स्त्रीला येणाऱ्या सर्व अनुभवांपैकी सर्वोत्कृष्ट आणि अमूल्य असा अनुभव असला तरी कधी कधी गर्भवती स्त्रियांमध्ये प्रजनन काळातील मधुमेहाची समस्या निर्माण होते. काही कारणांमुळे मातेच्या शरीरात पुरेशा प्रमाणात इन्शुलिन तयार होत असते, मात्र, त्याचा पुरेपूर किंवा योग्य प्रकारे वापर केला जात नाही. त्यामुळे तिच्या रक्‍तवाहिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ग्लुकोज किंवा साखर जमा होते. या परिस्थितीला हायपरग्लायशेमिया म्हणतात. हा त्रास फक्‍त स्त्री गर्भवती असतानाच होत असला तरीही त्याचे परिणाम दीर्घकाळ राहतात.

मातृत्व म्हणजे जणू आनंदाचा मुकुट परिधान करणे, स्त्रीत्वाचा सर्वांत मोठा सन्मान असं चित्र रंगवलं जात असलं तरी हेच मातृत्व त्याच्या काही समस्यांसोबतच येते. ज्यामुळे नव्याने आई झालेल्या स्त्रीला अपयश आल्याप्रमाणे नैराश्‍य येऊ शकते आणि तिच्या क्षमता आणि निर्णयांविषयी तिला असुरक्षित वाटू शकते.

आपल्या गर्भात एका बाळाची वाढ होणे, हा स्त्रीला येणाऱ्या सर्व अनुभवांपैकी सर्वोत्कृष्ट आणि अमूल्य असा अनुभव असला तरी काही वेळानंतर ती स्त्री आणि तिच्या बाळाला आयुष्यभर काही आजार साथ करतात. दरवर्षी संपूर्ण भारतात एक लाखांहून अधिक गर्भवती स्त्रियांमध्ये प्रजनन काळातील मधुमेहाची समस्या निर्माण होते. अद्याप अनाकलनीय असलेल्या काही कारणांमुळे मातेच्या शरीरात पुरेशा प्रमाणात इन्शुलिन तयार होत असते, मात्र त्याचा पुरेपूर किंवा योग्य प्रकारे वापर केला जात नाही. त्यामुळे, तिच्या रक्‍तवाहिन्यांमध्ये मोठया प्रमाणात ग्लुकोज किंवा साखर जमा होते. या परिस्थितीला हायपरग्लायशेमिया म्हणतात. हा त्रास फक्‍त स्त्री गर्भवती असतानाच होतो.

गर्भवती स्त्रियांना होणाऱ्या त्रासांमध्ये याचं प्रमाण अधिक आहे. साधारणपणे गर्भारपणाच्या मधल्या टप्प्यात म्हणजेच, 24 आणि 28 आठवडे या काळात हा त्रास निर्माण होतो. याच काळात मातेच्या इन्शुलिन वापरण्याच्या क्षमतेवर तिच्या संप्रेरकांचा परिणाम होतो.

गर्भवती स्त्रियांमधील मधुमेह दोन प्रकारचे असतात:
1. प्रजनन काळातील मधुमेह, ज्याचे निदान गर्भारपणात होते.
2. प्रजनन पूर्व किंवा आधीपासून असलेला मधुमेह (टाईप 1 आणि 2) याचे निदान गर्भ राहण्यापूर्वीच करता येते.

गर्भवती स्त्रियांना मधुमेह होण्याचे प्रमाण दर वीस स्त्रियांमागे 1 इतके आहे. साधारणपणे गर्भारपणाच्या तेराव्या आठवड्यापासून 28 व्या आठवड्यापर्यंत हा त्रास असतो आणि त्यानंतर गर्भारपणाबरोबरच संपतो. संप्रेरकांमधील बदल आणि वजन वाढणे ही निरोगी गर्भारपणाची लक्षणं आहेत. मात्र, काही वेळा हीच लक्षणे आपल्या शरीरावर नकारात्मक परिणाम करू शकतात. तुम्हाला गर्भ राहण्यापूर्वीच मधुमेह असेल तर त्याला प्रसूतीपूर्व मधुमेह असं म्हणतात. गर्भवती स्त्री मधुमेह रुग्ण असेल किंवा तिला संप्रेरकांमधील बदलांमुळे मधुमेह झाला तर बाळालाही मधुमेहाची लागण होण्याची शक्‍यता असते. त्याचप्रमाणे ते बाळ काही वैगुण्यांसह जन्माला येण्याची शक्‍यता असते.

डॉ. रोशनी गाडगे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)