गर्भधारणा आणि मधुमेह (भाग-2 )

गर्भधारणा आणि मधुमेह (भाग-१ )

गर्भवती स्त्रियांमधील मधुमेह तिच्यासाठी आणि तिच्या बाळासाठी अनेक प्रकारची गुंतागुंत तयार करू शकतो.
मातेवर परिणाम करणाऱ्या काही बाबी पुढीलप्रमाणे-
1. उच्च रक्‍तदाबामुळे प्री-एक्‍लप्मेशिया हा आजार उद्‌भवणे.
2. गर्भाशयात बाळाच्या भोवती असलेल्या द्रावणाच्या पातळीत वाढ होणे.
3. प्रसूतीच्या संभाव्य तारखेपूर्वीच, अगदी 37 आठवड्यांतही मुदतपूर्व प्रसूती.
4. सिझर होण्याची आणि त्यातून आणखी गुंतागुंत होण्याची शक्‍यता.
5. त्यानंतरच्या गर्भारपणातही प्रजनन काळातील मधुमेह होण्याची शक्‍यता.
6. उर्वरित आयुष्यात टाईप 2 प्रकारचा मधुमेह होण्याची शक्‍यता.

बाळावर होणारे संभाव्य परिणाम :
1. जन्मानंतर काही दिवस बाळाच्या रक्‍तात साखरेचे प्रमाण कमी असण्याची (हायपोग्लायशेमिया) शक्‍यता असते.
2. मातेच्या रक्‍तात गर्भारपणात अतिरिक्‍त साखर असल्यास मुदतपूर्व प्रसूती होऊ शकते.
3. फुप्फुसांची वाढ होण्याची संधीच मिळत नाही. यातून बाळाला श्‍वसनाचे विकार होण्याची शक्‍यता फारच जास्त असते.
4. ते बाळ भविष्यात स्थूल होण्याची शक्‍यता अधिक असते.
5. ते बाळ वयस्क झाल्यानंतर त्यालाही मधुमेहाचा त्रास होणे साहजिकच असते.

गर्भारपणात स्वत:ची काळजी कशी घ्याल?
प्रजनन काळातील मधुमेह टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे रक्‍तातील साखरेचं प्रमाण वाढू न देणे. यासाठीची तयारी तुम्ही गर्भार राहण्याआधीपासून करायला हवी. मात्र, तुम्हाला हा त्रास असेल तर त्याच्याशी सामना करण्यासाठी आणि त्याला रोखण्यासाठी काही महत्त्वाच्या बाबींचं पालन करणं आवश्‍यक आहे. या बाबी पुढीलप्रमाणे –

गर्भारपणाचा आराखडा तयार करा
गर्भ राहण्याआधीच शक्‍यतो तुमच्या डॉक्‍टरांशी चर्चा करा. गर्भ राहण्याआधीपासूनच तुमचे वजन योग्य असेल, याकडे लक्ष द्या.

रक्‍तातील साखरेची चाचणी करून घ्या
रक्‍तातील साखरेचं प्रमाण धोकादायक पातळीवर नाही ना हे पाहण्यासाठी तुम्ही डॉक्‍टरांना सांगून त्याची तपासणी करू शकता. तुम्ही गर्भार राहण्याच्या किमान तीन महिने आधीच रक्‍तातील साखर योग्य प्रमाणात आहे की नाही, हे तपासून घ्या. दर आठवड्याला किमान अडीच तास व्यायाम करा. त्यामुळे रक्‍तातील साखरेचे प्रमाण योग्य राखण्यास मदत होते. रक्‍तातील साखरेचे प्रमाण नियमितपणे तपासण्यासाठी ब्लड ग्लुकोज मीटर’चा वापर करा.

आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या
योग्य आहारपद्धतीचा अवलंब करा. त्यामुळे तुमच्या रक्‍तातील साखरेची पातळी योग्य प्रमाणात राहते आणि तुमच्या आणि तुमच्या बाळाच्या शरीराला योग्य प्रमाणात पोषण मिळते.
व्यायाम
या काळात योग्य आणि सुरक्षित व्यायाम करण्यासाठी तुमच्या फिटनेस एक्‍स्पर्टसशी चर्चा करा.

योग्य तपासणीचा निर्णय
गर्भारपणातील मधुमेह इन्शुलिनच्या साहाय्याने आटोक्‍यात ठेवता येतो. ओएचए वादग्रस्त आहे. इन्शुलिन थेरपीच्या साहाय्याने रक्तातील साखरेची पातळी योग्य प्रमाणात राखता येते. रक्तातील साखरेचे प्रमाण योग्य पातळीवर ठेवल्याने तुमच्या बाळाचं वजन वाढण्यास मदत होते. तसंच त्यामुळे मुदतपूर्व प्रसूती, गर्भपात रोखले जातात आणि गर्भारपणातून चांगले परिणाम साधण्यास तुम्हाला मदत होते.

चोवीस तासांच्या अंतराने इन्शुलिन पम्प घेतल्याने मधुमेह आटोक्‍यात ठेवण्यास मदत होते. पम्प अधिक परिणामकारक आहेत. कारण, ही इन्शुलिन देण्याची योग्य, अचूक आणि लवचिक पद्धत आहे. आणि रक्तातील साखरेचे अतिशय अचूक प्रमाण राखले जाते. त्यामुळे, माता आणि बाळ दोघांनाही गुंतागुंतीपासून सुरक्षा मिळते.

सोप्या शब्दांत सांगायचे तर, तुम्हाला प्रजनन काळातील मधुमेह होण्याची शक्‍यता अगदीच कमी असेल तरीही तुम्ही तुमच्या गर्भारपणाची नीट आखणी करायला हवी, तुमच्या डॉक्‍टरांशी यासंदर्भात बोला, डॉक्‍टरांकडे जाताना प्रत्येक वेळी तुमची सर्व औषधे सोबत बाळगा, पोषक आहार घ्या, व्यायाम करा आणि गर्भारपणात वजन अधिक वाढवू नका. या प्रकारची काळजी घेतल्याने तुमच्या रक्‍तातील साखरेचे प्रमाण योग्य पातळीवर राखले जाईल आणि प्रजनन काळातील मधुमेहापासून तुमचे संरक्षण होऊ शकेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)