गर्दीच्या वेळेत रस्ते खोदाईचा शहाणपणा नडला

वाहतूक कोंडी सोडवताना पोलिसांच्या आले नाकीनऊ  

पुणे – स्वारगेट येथील ग्रेड सेप्रेटरच्या पुढे नेहरू स्टेडियमसमोर महापालिकेने ऐन गर्दीच्या वेळीच रस्ते खोदाईचे काम सुरू केल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली. ती सोडवताना वाहतूक पोलिसांच्या नाकीनऊ आले. अखेर पोलिसांनी हे काम काही वेळासाठी थांबवले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जेधे चौकात ग्रेड सेप्रेटरची कामं करण्यात आल्यानंतर तेथे पुढे पावसाळी वाहिन्यांचे काम करण्यात आले नव्हते. हा रस्ता केवळ दुरुस्त करण्यात आला होता. त्यामुळे तेथे पावसाळ्यात खड्‌डे पडण्याचा प्रकार होतो. त्यामुळे येथे पावसाळी वाहिन्या टाकण्याचे आणि त्यावर सिमेंटचा रस्ता करण्याचे काम महापालिकेच्या प्रकल्प विभागातर्फे सुरू करण्यात आले आहे.

मात्र, स्वारगेटचा परिसर हा कायमच वाहनांनी गजबजलेला असतो. त्यातून सकाळी अकरा वाजल्यानंतरची वेळ ही अक्षरश: येथे युद्धजन्य परिस्थिती असते. अशावेळी येथे बॅरीकेडस लावून, रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. येथे असलेला डांबरी रस्ता खोदण्यात आला. मात्र यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली, वाहतूक धीम्या गतीने झाल्याने स्वारगेटला मिळणाऱ्या सर्वच रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली.

त्यामुळे वाहतूक पोलीसही वैतागले. त्यांनी काम थांबवले; परंतु रस्ता उखडल्यामुळे त्याठिकाणाहून वाहतूक पुढे नेणेही शक्‍य झाले नाही.

पावसाळा सुरू होण्याआधी ही कामे करणे आवश्‍यक आहे. ती कामे केली नाहीत, तर पुन्हा खड्‌डे पडण्याचा प्रश्‍न निर्माण होणार आहे. ही कामे करावीच लागणार आहेत. यामध्ये नागरिकांची, वाहनचालकांची गैरसोय होणार आहे; परंतु कामही महत्त्वाचेच आहे. याशिवाय या कामाला वाहतूक पोलिसांची लेखी परवानगी घेतली आहे.

– श्रीनिवास बोनाला, प्रमुख, महापालिका प्रकल्प विभाग


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)